गडचिरोलीत जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक
By Admin | Published: May 2, 2016 12:37 AM2016-05-02T00:37:42+5:302016-05-02T00:37:42+5:30
कुरखेडा तालुक्यातील कोटगल पोलीस मदत केंद्राच्या हद्दित रविवारी सकाळी विशेष अभियानाचे पथक व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील कोटगल पोलीस मदत केंद्राच्या हद्दित रविवारी सकाळी विशेष अभियानाचे पथक व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी जंगलामध्ये पळ काढला. घटनास्थळावरून नक्षल पिटू व साहित्य जप्त करण्यात आले. या परिसरात नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
एकाचे आत्मसमर्पण
पोलिसांनी सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेंतर्गत कंपनी क्रमांक ४ चा सदस्य असलेला जहाल नक्षलवादी रामजी उर्फ रामसू महादू पोटावी (२७, रा. जवेली ता. एटापल्ली) याने पोलिसांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले.
रामजी पोटावी हा आॅगस्ट २००६ पासून नक्षल चळवळीत कार्यरत होता. कसनसूर दलम प्लाटून क्रमांक ५६ व कंपनी क्रमांक ४ मध्ये तो कार्यरत होता. झुरी जंगल चकमक, कोटमी जंगल चकमक, मरकेगाव, मुंगनेर, हत्तीगोटा व भिमनखोजी आदी १७ चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. (प्रतिनिधी)