गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

By admin | Published: October 21, 2014 12:53 AM2014-10-21T00:53:25+5:302014-10-21T00:53:25+5:30

लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे

Gadkari-Fadnavis leader Kaul | गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

Next

मतभेदांच्या अफवा : उत्तम समन्वयाने साधला विजय
नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला एकतर्फी कौल दिला. विशेष म्हणजे निवडणूक काळात कितीही अफवा उडाल्या तरी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे डाव साधल्या गेला.
भाजपसमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान होते. त्यातही गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते नागपुरातील असल्याने नागपूरची कुठलीही जागा गमावून चालणार नव्हते. याची जाणीव या दोन्ही नेत्यांना असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. निवडणुकीत गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणा काम करीत होत्या. मात्र, ही यंत्रणा कुणाच्याही एकमेकांच्या मार्गात आडवी आली नाही. उलट जेथे एक यंत्रणा कमी पडताना दिसली तेथे दुसरी यंत्रणा तत्काळ धावून गेली. दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त समन्वय होता. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्यातील बहुतांश तिकीट वाटप गडकरींच्या मनाने झाले. त्याला फडणवीसांची पूर्ण संमती होती. या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. त्यानंतरही ते विचलित झाले नाही. उलट अधिक समन्वयाने आव्हानाला सामोरे गेले. फडणवीस यांना राज्यात प्रचारासाठी फिरायचे होते. मतदारसंघात अधिक लक्ष देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गडकरींची फौज दक्षिण-पश्चिममध्ये धावून गेली. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण निवडणूक निकालानेच दिले. लोकसभेमध्ये गडकरींना दक्षिण-पश्चिममध्ये ६० हजारावर लीड होती, तर फडणवीस यांनादेखील त्याच्याच आसपास लीड मिळाली. राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे या दोन्ही नेत्यांचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक होते. पश्चिम नागपुरात सुधाकर देशमुख अडचणीत असल्याचे लक्षात येताच, शेवटच्या तीन दिवसात या नेत्यांनी पक्षाचे कॅडर पश्चिममध्ये सक्रिय केले. खा. अजय संचेती यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वांना हाताशी धरून कामाला लावण्यात आले. दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांच्यासाठीही अशीच जबाबदारी पार पाडण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. काटोल, हिंगणा, रामटेक या मतदारसंघातही दोन्ही नेत्यांनी विश्वासातील लोकांना कामी लावले. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात संवाद साधला. नाराजांना भविष्यात सामावून घेण्याचा विश्वास दिला, तर दुसऱ्या पक्षातील नाराजांना पक्षात घेत कामी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या समन्वयातूनच विजयाचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Gadkari-Fadnavis leader Kaul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.