उद्धवच्या मनधरणीसाठी गडकरी धावले

By admin | Published: February 28, 2015 05:25 AM2015-02-28T05:25:54+5:302015-02-28T05:25:54+5:30

केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला असलेला विरोध शिवसेनेने मागे घ्यावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी

Gadkari ran for the discussion of Uddhav | उद्धवच्या मनधरणीसाठी गडकरी धावले

उद्धवच्या मनधरणीसाठी गडकरी धावले

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला असलेला विरोध शिवसेनेने मागे घ्यावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. तसेच शिवसेना व भाजपामध्ये इतर मुद्यांवरून निर्माण झालेला तणाव निवळावा, यादृष्टीनेही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समाधान करण्याची जबाबदारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोपवली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भूसंपादन विधेयक मार्गी लावण्याकरिता पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अधिवेशनाच्या तोंडावर बारामतीत येऊन पायधूळ झाडली व शरद पवार यांच्यावर स्तूतीसुमने उधळली. पण शिवसेना सत्तेत सहभागी असतानाही विरोध करीत आहे. केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. रेल्वे अर्थसंकल्पावरही सेनेने सडकून टीका केली. मुंबई महापालिकेचा विकास आराखडा, एफएसआय, चौपाटीवरचे एलईडी बल्ब आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या, अशा नानाविध कारणांवरून भाजपाला धारेवर धरण्याची एकही संधी शिवसेना सध्या सोडत नाही. कट्टर विरोधकांपेक्षाही सेनेसारख्या मित्रपक्षाकडून होणाऱ्या या टिकेमुळे भाजपाची कोंडी होत आहे. त्यामुळे मोदींना गडकरी यांना संकटमोचक म्हणून धाडावे लागले आहे. मात्र गडकरी भेटीनंतर सेनेने याबाबतची आपली भूमिका रात्री उशिरापर्यंत स्पष्ट केली नाही.

Web Title: Gadkari ran for the discussion of Uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.