'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 04:59 PM2023-07-24T16:59:50+5:302023-07-24T17:00:44+5:30

गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही.

Gadkari told the story of election campaigning, even we delivered one kg of mutton to the house, than we lost the election | 'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

'एक-एक किलो मटण घरापर्यंत पोहोचवलं, तरी आम्ही निवडणूक हारलो...', गडकरीं सांगितला भन्नाट किस्सा

googlenewsNext

 भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी अत्यंत प्रसिद्द आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्याच एका निवडणूक प्रचाराचा किस्सा सांगितना, आपण मटण वाटूनही निवडणूक कशी हरलो हे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, मतदार अत्यंत हुशार असतात. ते सर्वांनी दिलेला माल ठेऊन घेतात आणि ज्याला मत द्यायचे त्यालाच देतात, असे गडकरी म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
यावेळी गडकरींनी सांगितले, लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयोग करून चुकलो आहे. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घरी पोहोचवण्याचेही काम झाले. पण आम्ही निवडणूक हरलो.

लोक हुशार आहेत - 
गडकरी म्हणाले, लोक अत्यंत होशार आहेत. ते म्हणतात, जे देत आहेत ते ठेवूनघ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे, जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नलते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही.

नितिन गडकरी म्हणाले, लोक म्हणतात सर MP चे तिकीट द्या. नाही तर MLA चे तरी तिकीट द्या. नाही तर MLC तरी बनवा. हे नसेल तर आयोग तरी द्या. यांपैकी काहीच नाही, तर मेडिकल कॉलेज द्या. मेडिकल कॉलेज नाही तर, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा फिर Bed कॉलेज तरी द्या. हीही शक्य नसेल, तर प्रायमरी स्कूल तरी द्या. यातून शिक्षकांचा अर्धा पगार आम्हाला मिळेल. मात्र याने देश बदलत नाही.

Web Title: Gadkari told the story of election campaigning, even we delivered one kg of mutton to the house, than we lost the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.