विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार, एक महिना देणार, मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 12:10 PM2024-09-07T12:10:26+5:302024-09-07T12:10:59+5:30

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील.

Gadkari will be active in the assembly campaign, will give one month, but Devendra Fadnavis will be the leader | विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार, एक महिना देणार, मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच

विधानसभेच्या प्रचारात गडकरी सक्रिय होणार, एक महिना देणार, मात्र नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचेच

 नागपूर - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू,  गडकरी यांनी प्रचारासाठी एक महिना देण्याचे मान्य केले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही २१ नेते महाराष्ट्रात वेगवेगळ्या समित्यांमध्ये काम करणार आहोत. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे प्रचार समन्वयक असतील.  सगळ्या नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे. भूपेंद्र यादव, अश्वनी वैष्णव प्रभारी आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रेम करतो. त्यांनी निवडणूक प्रचारासाठी एक महिना द्यावा, अशी विनंती त्यांना केली होती, ती त्यांनी मान्य केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी नागपूर सोडून १५ दिवस दिलेले होते, असे बावनकुळे म्हणाले. 

गडकरी देशासाठी आदर्श आहेत
- गडकरींना महाराष्ट्र हृदयाने प्रेम करतो. भारतीय जनता पक्षासाठी ते काम करणारे आहेत. देशासाठी आदर्श आहेत.
- लोकसभेत त्यांनी पंधरा दिवस महाराष्ट्राला दिले, विधानसभेत एक महिना देतील, महाराष्ट्रासाठी नितीन गडकरी पूर्ण एक महिना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस तेरी खैर नही, याचा अर्थ काय?
-‘एकनाथजी से बैर नही, फडणवीस तेरी खैर नही’, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून आले आहे. याचा अर्थ काय निघतो. 
- सगळे मिळून फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप यावेळी बावनकुळे यांनी केला.

Web Title: Gadkari will be active in the assembly campaign, will give one month, but Devendra Fadnavis will be the leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.