गडकरी घेणार विदर्भातील जलसंधारण कामांचा आढावा
By admin | Published: March 11, 2017 02:27 AM2017-03-11T02:27:22+5:302017-03-11T02:27:22+5:30
१६ मार्चला बैठक; आमदारांसह अधिका-यांना सूचना.
वाशिम, दि. १0- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भातील जलसंधारणाची कामे व अन्य विषयांचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी त्यांनी विदर्भातील जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसह आमदारांची बैठक बोलावण्याच्या सूचना राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला केल्या आहेत. त्यानुसार १६ मार्च रोजी विधानभवनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विदर्भातील आमदार आणि जलसंधारण विभागाच्या अधिकार्यांना या बैठकी उपस्थित राहण्याच्या सूचना करणारे पत्र जलसंधारण विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांनी ८ मार्च रोजी पाठविले आहे. विदर्भातील प्रलंबित जलसंधाणाची कामे, तसेच नव्या प्रस्तावित कामांबाबत गडकरी राज्याचे जलसंधारण मंत्री, आमदार, तसेच अधिकारी कर्मचार्यांशी चर्चा करणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या स्वीय सचिवांनी ही माहिती दिली.