सोलापूरच्या सुपुत्रांची गगन भरारी
By Admin | Published: May 10, 2016 07:33 PM2016-05-10T19:33:30+5:302016-05-10T20:09:26+5:30
यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेला विद्यार्थी योगेश विजय कुंबेजकर हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 10- केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा तशी खूपच अवघड. या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसतात. मात्र पास हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होतात. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आलेला विद्यार्थी योगेश विजय कुंबेजकर हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या कुंभेजला वास्तव्याला आहे. योगेश कुंभेजकर याचे १ ली ते ४ थीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या नुमवि प्रशालेत झाले. त्यानंतर त्याचे ५ ते १० पर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे झाले. ११ आणि १२ वीचे शिक्षण पुणे येथील एस पी कॉलेज येथे झाले. १२वी नंतर आयआयटी पवई येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा कोर्स पूर्ण केला. याचवेळी जिल्हा बँकेत एका वरिष्ठ अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने योगेश याने डीसीसी बँकेत ६ महिने नोकरी केली़. याचवेळी आपल्याला आयआयएस व्हायचे हे ठरवून त्यांनी पुन्हा अभ्यासास सुरुवात केली़. २ वर्ष त्याने अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला. यूपीएससीच्या पहिल्या वर्षी परीक्षा देऊन मुलाखत दिली़. त्यात योगेशला १४३ वी श्रेणी मिळाली होती़. त्यानंतर हैदराबाद येथे ट्रेनिंग घेतले. ६ मे रोजी झालेल्या मुलाखतीचा आज निकाल लागला. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा आलेला विद्यार्थी हणमंत कोंडिबा झेंडगे हा देखील सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील भांबेवाडीतला रहिवासी आहे. तो महाराष्ट्रातून दुसरा तर देशातून 50 वा क्रमांक पटकावून यशस्वी झाला आहे. एकंदरीतच सोलापुरातल्या या सुपुत्रांनी स्वतःच्या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्राची मान देशासमोर उंचावली आहे.