गायकवाडांवरील विमानबंदी पूर्णत: उठली

By admin | Published: April 9, 2017 04:52 AM2017-04-09T04:52:57+5:302017-04-09T04:52:57+5:30

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर

Gaikwad airplane completely rises | गायकवाडांवरील विमानबंदी पूर्णत: उठली

गायकवाडांवरील विमानबंदी पूर्णत: उठली

Next

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर, वादात सापडलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी एअर इंडियापाठोपाठ इतर सर्व एअरलाइन्सने शनिवारी उठविली. मात्र, तरीही खा. गायकवाड यांनी दिल्ली ते मुंबई हा प्रवास रेल्वेनेच केला.
आपल्यावरील विमानबंदी उठविण्यात यावी, असे पत्र खा. गायकवाड यांनी शुक्रवारी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना लिहिले होते आणि त्यात त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल खेदही व्यक्त केला होता. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरील बंदी एअर इंडियाने शुक्रवारी तत्काळ हटवली होती. जेट एअरवेज, गो-एअर, स्पाइसजेट आणि
इंडिगो या सर्व विमान कंपन्यांनी ही बंदी शनिवारी मागे घेतली. तरीही गायकवाड शुक्रवारी रेल्वेनेच दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले.
मुंबईत आल्यानंतर खा. गायकवाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी खा. गायकवाड यांना समज दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. (प्रतिनिधी)

बिझनेस क्लास नसल्याने झाला होता वाद
रवींद्र गायकवाड संसद अधिवेशनासाठी एअर इंडियाच्या विमानाने पुण्याहून दिल्लीला जात असताना, त्यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला. बिझनेस क्लासचे तिकीट असताना आपणास विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले, अशी त्यांची तक्रार होती, पण ते ज्या एअर इंडियाच्या विमानाने गेले, त्यात बिझनेस क्लास नव्हता आणि त्याची कल्पना एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने गायकवाड यांच्या कार्यालयाला दिली होती.

Web Title: Gaikwad airplane completely rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.