मेट्रोच्या श्रेयात गायकवाडांची उडी
By admin | Published: November 2, 2016 03:26 AM2016-11-02T03:26:09+5:302016-11-02T03:26:09+5:30
डोंबिवली मेट्रोच्या श्रेयावरून वाद रंगलेला असताना कल्याण पूर्वेतील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनीही त्यात उडी घेतली
कल्याण : कल्याणहून भिवंडीमार्गे ठाण्याला जाणाऱ्या मेट्रोचा सध्याचा मार्ग निम्म्याहून ्धिक कल्याणसाठी गैरसोयीचा आहे. त्यामुळे तो बदलण्याची मागणी शिवसेना नेते रवी पाटील यांनी केली आहे. एपीएमसीतून आग्रा रोडमार्गे दुर्गाडीला जाण्याऐवजी रेल्वे स्टेशन, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, दुर्गाडीमार्गे ही रेल्वे भिवंडीला नेल्यास मोठ्या लोकसंख्येला तिचा उपयोग होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याच मार्गावरून शीळ-भिवंडी उड्डाणरस्ता जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
सध्याचा मार्ग चुकीचा असल्याने मेट्रोचा भिवंडीला जितका फायदा होईल, तितका कल्याणला होणार नाही. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच हा मार्ग दुरूस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नव्या मार्गाचा फायदा भवानी चौक, बिर्ला गेट, खडकपाडा, आधारवाडी या भागाला होईल. शहाडला राहणाऱ्यांनाही मेट्रोचा दिलासा मिळेल. त्यामुळे मेट्रोचा मार्ग बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांना देण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
मेट्रोच्या श्रेयाच्या वादात शिवसेनेने भाजपावर कुरघोडीचा प्रयत्न चालवला असतानाच हा मार्गबदलाचा मुद्दा समोर आला आहे. (प्रतिनिधी)
>कोंडी आणखी काही वर्षे
मेट्रोमुळे भविष्यात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असली, तरी तो मार्ग पूर्ण होईपर्यंत मात्र नागरिकांना रस्त्यांतील रेल्वेच्या कामामुळे किमान चार ते पाच वर्षे कोंडीचा सामना करावा लागणार आहे. शीळ ते भिवंडी मार्गावरून जाणारा उड्डाणपूल, कल्याण-शीळ आणि कल्याण-भिवंडी मेट्रोमुळे शहरातील रस्ते खोदले जातील. त्यामुळे हे सर्व प्रकल्प सुरू होऊन प्रत्यक्षात येईपर्यंत वेगवेगळ््या मार्गाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
अंबरनाथ, बदलापूरला टाटा : २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरपर्यंत मेट्रो आणली जाईल, असे आश्वासन दिले होते. आघाडीने केवळ मेट्रोचे स्वप्न दाखविले. ते भाजप सरकारने पूर्णत्वास नेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मात्र युती सरकारनेही मेट्रो कल्याणला आणली, पण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरमधील नागरिकांचा भ्रमनिरास केल्याची टीका सुरू झाली आहे.