अमेरिकेतील भाविकांना घडणार गजानन महाराजांचे दर्शन

By admin | Published: January 22, 2016 05:13 PM2016-01-22T17:13:34+5:302016-01-22T17:13:34+5:30

अमेरिकेतील जॉर्जिया येथे बांधण्यात आलेले श्री गजाजन महाराजांचे मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे येथील मंदिराच्या समितीकडून सांगण्यात आले.

Gajananan Maharaj's visit to America will happen | अमेरिकेतील भाविकांना घडणार गजानन महाराजांचे दर्शन

अमेरिकेतील भाविकांना घडणार गजानन महाराजांचे दर्शन

Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २२ -  अमेरिकेतील जॉर्जिया येथे बांधण्यात आलेले श्री गजाजन महाराजांचे मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे येथील मंदिराच्या समितीकडून सांगण्यात आले. यामुळे अमेरिकेत असणा-या सर्व भाविकांना श्री गजानन महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.  
अमेरिकेत असलेले सर्व भाविक उद्या जॉर्जियातील डुनवूडी येथे उभारण्यात आलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी येतील असे, ठाण्यातील श्री गजाजन महाराज मंदिराचे सदस्य सुनील जोशी यांनी सांगितले. जॉर्जियातील मंदिरात ३ फूट उंचीची मार्बलपासून बनविण्यात आलेली गजानन महाराजांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती पंढरपूरमध्ये घडवलेली असल्याचे यावेळी सुनील जोशी यांनी सांगितले. 
विदर्भातील शेगाव येथे  श्री गजाजन महाराजांचे मुळ आणि सर्वात मोठे मंदिर आहे.  
 

Web Title: Gajananan Maharaj's visit to America will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.