धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:53 PM2024-07-29T15:53:01+5:302024-07-29T15:55:30+5:30

Dhananjay Munde : मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्या पित्ताशयावर डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

Gallbladder surgery on Dhananjay Munde, doctor advises rest in hospital for next four days | धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया, पुढील ४ दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला

मुंबई  : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पित्त व पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, हा पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. 

मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्या पित्ताशयावर डॉ.अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बुधवारी (२४ जुलै) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर शुक्रवारी (२६ जुलै) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस त्यांना रुग्णालयातच विश्रांती व पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची फोनद्वारे विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

Web Title: Gallbladder surgery on Dhananjay Munde, doctor advises rest in hospital for next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.