प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

By admin | Published: April 27, 2016 06:27 AM2016-04-27T06:27:23+5:302016-04-27T06:27:23+5:30

एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे.

Games with the help of passengers! | प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

प्रवाशांच्या जिवाशी खेळ!

Next

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रीदवाक्य असणारे एसटी महामंडळ ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असल्याचा दावा करते. मात्र हा प्रवास आता कितपत सुरक्षित राहिला आहे हा मोठा प्रश्नच गेल्या चार महिन्यात निर्माण झाला आहे. गेल्या चार महिन्यात एसटीच्या बस गाड्यांना आग लागल्याचा पाच घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेत परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी संबंधित बस असलेल्या टाटा कंपनीकडून अहवाल मागितला आहे.
सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी नऊच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मुरुड-मुंबई बसने चिंचवण येथे पेट घेतल्याची घटना घडली. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला उभी केली आणि त्वरीत ५४ प्रवाशांना उतरविले. इंजिनमधील शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. ही घटना घडण्यापूर्वी जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या चार घटना घडल्या आणि सोमवारी घडलेली ही पाचवी घटना आहे. वाडा त्यानंतर ठाणे शहर, मराठवाड्यात भूम येथे, खंडाळा घाटात आणि आता चिंचवण येथे एसटी बस गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनेत बसमध्ये प्रवासी होते आणि चालक-वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचा जीव वाचला आहे. याबाबत एसटीतील सूत्रांनी सांगितले की,घडलेल्या पाच घटनांमध्ये तीन सेमी लक्झरी आणि दोन साध्या बसचा समावेश आहे. या सर्व बसची बॉडी एसटी महामंडळाकडून बांधण्यात आली आहे. मात्र बसमधील इंजिन आणि अन्य इलेक्ट्रीकल कामे टाटा कंपनीची आहेत. त्यांच्याकडूनच होणाऱ्या कामांत काही चुका होत आहेत की अन्य काही कारणे आहेत याची माहीती एसटी महामंडळाकडून घेतली जात
>सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटनांची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. टाटा कंपनीला यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे आणि त्वरीत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी अहवाल सादर करताच पुढील निर्णय घेण्यात येईल.
- दिवाकर रावते (परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)

Web Title: Games with the help of passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.