गानगुरू पं. बबनराव हळदणकर यांचे निधन
By Admin | Published: November 18, 2016 04:50 PM2016-11-18T16:50:30+5:302016-11-18T16:50:30+5:30
आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक व गानगुरू पं.बबनराव हळदणकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. पं. बबनराव हळदणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक व गानगुरू पं.बबनराव हळदणकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
पं. बबनराव हळदणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांनी अखेरचा राहत्या घरीच श्वास घेतला. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 9 ते11 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पं. बबनराव हळदणकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. आग्रा घराण्याचे अध्वर्यू व बंदिश रचनाकार व संगीत विचारवंत अशी त्यांची चतुरस्र ओळख असल्याने त्याच्या यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.