Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांनो, गांधीगिरी करा - मकरंद अनासपुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 09:38 PM2018-03-28T21:38:40+5:302018-03-28T21:38:40+5:30

गटतटाच्या राजकारणामुळे गावांचे उकिरडे झाले आहेत. विरोधासाठी विरोध केला जात आहे. अज्ञान हे विरोधाचे कारण आहे. गावक-यांनी विकासात सहभागी झाले पाहिजे.

Gandhgiri for the benefit of government schemes - Makrand Anaspure | Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांनो, गांधीगिरी करा - मकरंद अनासपुरे

Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांनो, गांधीगिरी करा - मकरंद अनासपुरे

googlenewsNext

मुंबई-  गटतटाच्या राजकारणामुळे गावांचे उकिरडे झाले आहेत. विरोधासाठी विरोध केला जात आहे. अज्ञान हे विरोधाचे कारण आहे. गावक-यांनी विकासात सहभागी झाले पाहिजे. सरपंच व सदस्यांनी शासकीय योजनांचा फायदा करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा व काम होईस्तोवर संबंधित अधिका-याच्या कार्यालयात गांधीगिरी करावी, असा सल्ला सिनेअभिनेता, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिला.

‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला; याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री महादेव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ज्युरी मंडळाचे अध्यक्ष तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, आदर्श सरपंच पोपटराव पवार, बीकेटी टायर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद पोद्दार, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार उपस्थित होते. 

Web Title: Gandhgiri for the benefit of government schemes - Makrand Anaspure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच