गांधी उद्यान ते ठाणे दहा मिनिटांत
By admin | Published: July 19, 2016 04:16 AM2016-07-19T04:16:56+5:302016-07-19T04:16:56+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे अंतर घोडबंदर रोडमार्गे पार करण्यासाठी सध्या ५० मिनिटे ते एक तास लागतो.
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते ठाणे अंतर घोडबंदर रोडमार्गे पार करण्यासाठी सध्या ५० मिनिटे ते एक तास लागतो. हे अंतर १० मिनिटांत पार करणारा प्रस्तावित भुयारी मार्ग भविष्यात साकारणार आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री(उपक्रम) एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, त्यांनी यासाठी ५० कोटींचा निधी दिला असल्याची माहिती मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.
नॅन्सी एस.टी.डेपोचे रूपडे पालटणार असून, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १००
कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मागाठाणे विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कांदिवली(पूर्व)ठाकूर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या एका वार्तालापात
उत्तर मुंबई पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकारांसाठी हा वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या वेळी गेल्या २० महिन्यांत आमदार म्हणून मागाठाणे विधानसभा मतदार संघ केलेल्या विकासकामांचा आणि आगामी प्रस्तावित कामे
आणि योजनांचा या वेळी आढावा घेतला. गेल्या २० महिन्यांत
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १ लाख झाडे लावून, त्यांचे संवर्धनदेखील
करण्यात आले, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपुलाखाली होत असलेली वाहतूककोंडी दूर होण्यासाठी, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या १५ लाखांच्या निधीतून पुलाखालून श्रीकृष्णनगरच्या दिशेने नवीन रस्त्याची निर्मिती केली.
कांदिवली(पूर्व) येथील दामूनगर झोपडपट्टीला गेल्या ७ फेब्रुवारीला भीषण आग लागली होती. आपला संसार बेचिराख झालेल्या झोपडीधारकांना प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसहाय्य शासनाकडून मिळवून देण्यासाठी, सभागृहात आवाज उठवून विशेष प्रयत्न
केले, अशी त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली. (प्रतिनिधी)
या भुयारी मार्गासाठी एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींचा निधी दिला तर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहीती सुर्वे यांनी दिली.