कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’
By Admin | Published: October 3, 2014 02:01 AM2014-10-03T02:01:01+5:302014-10-03T02:01:01+5:30
सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकत्र्यानी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले.
>कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकत्र्यानी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी फुलेवाडी, शाहू, शिये व शिरोली टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. सकाळी 1क् ते दुपारी 1 वाजेर्पयत नाक्याच्या दोन्ही बाजूंना 2क्क् मीटर अंतरांवर थांबून कार्यकत्र्यानी वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती केली. ‘टोल देणार नाही’ची स्टिकर वाहनावर चिकटविली जात होती. वाहनधारकांच्या प्रतिसादामुळे गांधी जयंतीनिमित्त झालेले हे आंदोलन शांततेत पार पडले.
शहराच्या उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम अशा या चारही मुख्य नाक्यांवर सकाळी 1क् वाजता टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते जमा झाले. नाक्यांच्या दोन्ही बाजूंना थांबून वाहनधारकांना विनंती करण्याचे नियोजन आंदोलकांनी केले. हातात लाल निशाण घेत ‘देणार नाही.. देणार नाही.. टोल आम्ही देणार नाही’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.
शिरोली नाक्यावर मानवी साखळी करून दोन ते पाच मिनिटे वाहनांना रोखून विनंती केली
जात होती. आंदोलनामुळे
चारही नाक्यांपासून काही अंतरावर वाहनांची मोठी रांग लांगली होती. (प्रतिनिधी)