गणेशोत्सवापूर्वी शाळांना खूषखबर देऊ

By admin | Published: July 22, 2016 03:48 AM2016-07-22T03:48:13+5:302016-07-22T09:20:09+5:30

राज्यातील अनुदान प्राप्त ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला

Before the Ganesh festival, I would like to thank the schools | गणेशोत्सवापूर्वी शाळांना खूषखबर देऊ

गणेशोत्सवापूर्वी शाळांना खूषखबर देऊ

Next


मुंबई : राज्यातील अनुदान प्राप्त ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून ज्या शाळा अनुदानास पात्र आहेत त्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्याचे काम वित्त व नियोजन खात्यामार्फत सुरु आहे. ते पूर्ण होताच येत्या गणेशोत्सवापूर्वी शाळांमधील शिक्षकांना त्यांचे २०% वेतन अनुदान मिळेल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले.
याबाबत आ. नागो गाणार, अनिल सोले, विक्रम काळे आदींनी प्रश्न विचारला होता. विद्यार्थी नसताना शिक्षक दाखवून पैसे घेणाऱ्या संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून त्यात अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना २० टक्के प्रमाणे १९२४७ शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना सुमारे १६३ कोटी इतक्या रक्कमेची मंजुरी देण्यात आली आहे. शिक्षकांचा पगार योजनेत्तर आणि योजनाबाहय नियोजनातून देण्याबाबत विचार सुरु आहे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Before the Ganesh festival, I would like to thank the schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.