खड्ड्यांमुळे गणेश मूर्तीकारही हवालदिल

By Admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:51+5:302016-08-28T05:20:51+5:30

मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यात गेले आहेत़. डेडलाइन संपल्यानंतरही खड्डे कायम असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच नव्हे, तर मूर्तिकारही धास्तावले आहेत.

Ganesh idol of Ganesh idols due to pits | खड्ड्यांमुळे गणेश मूर्तीकारही हवालदिल

खड्ड्यांमुळे गणेश मूर्तीकारही हवालदिल

googlenewsNext

- शेफाली परब-पंडित, मुंबई

मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यात गेले आहेत़. डेडलाइन संपल्यानंतरही खड्डे कायम असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच नव्हे, तर मूर्तिकारही धास्तावले आहेत. त्यामुळे
गणेश चित्रशाळांतून मूर्ती रस्त्यावर आल्यानंतर जबाबदारी मंडळांनी घ्यावी, असे मूर्तिकारांनी गणेशोत्सव मंडळांना आधीच स्पष्ट केले आहे़
गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेने दिले होते़ अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती तारेवरची कसरत करीत खड्ड्यांतूनच आणल्या़ मात्र दुसरी डेडलाइन संपल्यानंतरही खड्डे कायम असल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे़ मंडळांनी आता गणेशमूर्ती सुखरूप मंडपापर्यंत आणण्यासाठी खबरदारी घेतली आहे़ मात्र वाढत्या खड्ड्यांमुळे आता मूर्तिकरांचे टेन्शनही वाढले आहे़ मूर्तीला धक्का बसल्यास मंडळं मूर्तिकारांना दोष देतील, अशी भीती काहींना वाटते आहे़ त्यामुळे मूर्तिकारांच्या कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर त्या गणेशमूर्तीची जबाबदारी मूर्तिकारांची नसेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे़ याबाबत मूर्तिकारांनी आपल्याकडे तक्रार केली असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी नरेंद्र दहिबावकर यांनी सांगितले़
गणेशोत्सव मंडळांची नाराजी
२१ आॅगस्टची डेडलाइन संपल्यानंतर २६ आॅगस्टचा वायदा पालिकेने दिला़ मात्र आता मुसळधार पाऊस सुरू असल्याने खड्डे कसे बुजविणार, असे सांगण्यात येत आहे़ पालिकेच्या या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे़
मूर्तिकारही हवालदिल
चार ते पाच महिन्यांआधीच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्यास सुरू करतात़ मेहनतीने रात्रंदिवस काम करून तयार केलेल्या मूर्ती खड्ड्यांतून कशा नेणार, असा प्रश्न मूर्तिकारांनाही पडला आहे़ मात्र एखाद्या मूर्तीला धक्का बसल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ त्यामुळे कारखान्यातून बाहेर पडलेल्या मूर्तीची जबाबदारी मंडळांनी घ्यावी, असे मूर्तिकारांनी समन्वय समितीला कळविले आहे़ याला प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांनी दुजोरा दिला आहे़
रस्त्यांची बिकट स्थिती
लालबाग, परळ, घाटकोपर, कुर्ला येथील रस्ते खड्ड्यात असल्याने गणेशमूर्ती नेणे जिकिरीचे असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले़

अखेर मंडळेच लागली कामाला
- २१ आॅगस्टनंतर २६ आॅगस्टची डेडलाइन संपली तरी अनेक रस्ते खड्ड्यात असल्याने आता गणेशोत्सव मंडळांनीच बाप्पाच्या मार्गातील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्याची जबाबदारी उचलली आहे़ त्यानुसार गणेशमूर्ती घेऊन येताना खड्ड्यावर पोतं टाकून त्यावर स्टील प्लेट चढवून त्यावरून ट्रॉली पुढे सरकविण्यात येईल़
जेणेकरून गणेशमूर्ती सुखरूप मंडपापर्यंत नेता येईल़ मात्र यामुळे वाहतूककोंडी अथवा मिरवणुकीला विलंब झाल्यास मंडळांना जबाबदार धरू नये, अशी विनंतीही समितीने केली आहे़

सर्वाधिक खड्ड्यांचे वॉर्ड्स
वॉर्ड खड्डे
बोरिवली- आर/सी५६४
अंधेरी पश्चिम- के/डब्ल्यू४२३
मालाड - पी/ एन४१०
दादर - जी/एन२२०
अंधेरी पूर्व- के/ई १९५
२०१६ मध्ये ३ हजार ७८२ खड्डे होते, त्यापैकी ९१ खड्डे उरले आहेत, असा दावा पालिकेने केला आहे.

Web Title: Ganesh idol of Ganesh idols due to pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.