गणेश विसर्जनावेळी सांगलीत एक बुडाला
By admin | Published: September 23, 2015 12:59 AM2015-09-23T00:59:27+5:302015-09-23T00:59:27+5:30
गणेश विसर्जनावेळी आणखी एक तरुण कृष्णा नदीत बुडाला. विठ्ठल गोविंद वलकले (२५) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता सरकारी घाटावर ही घटना घडली.
सांगली : गणेश विसर्जनावेळी आणखी एक तरुण कृष्णा नदीत बुडाला. विठ्ठल गोविंद वलकले (२५) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता सरकारी घाटावर ही घटना घडली.
विठ्ठल वलकले हा मूळचा मराठवाड्यातील होता. तो कुपवाड एमआयडीसीत एका कारखान्यात कामाला होता. सरकारी घाटावर मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले होते.
त्या वेळी विठ्ठलही पाण्यात उतरला होता; पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचा मित्र बालाजी वापनवाड याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विठ्ठल नदीत बुडून वाहून गेला असल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आहे; पण तो अद्याप सापडलेला नाही.
सोमवारी सकाळी गणपती विसर्जनास गेलेल्या प्रकाशनगर (कुपवाड) येथील दादासाहेब जाधव व भैरवनाथ जाधव या सख्ख्या चुलत भावांचाही नदीत बुडाल्याने मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)