गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर! जीआर निघाला, कधीपासून? कसा आणि कुठे काढाल पास...
By अनिकेत घमंडी | Published: September 15, 2023 05:22 PM2023-09-15T17:22:27+5:302023-09-15T17:23:08+5:30
toll free pass Ganesh Festival: “गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स गाड्यांवर चिकटविले जाणार आहेत.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने चार दिवस आधीच टोलमाफी केली आहे. “गणेशोस्तव २०२३, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स गाड्यांवर चिकटविले जाणार आहेत. यानंतर कार, बस आदींना टोल माफी दिली जाणार आहे.
यासाठी १६.०९.२०२३ ते दि.०१.१०.२०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना ही टोलमाफी देण्यात येणार आहे.
टोलमाफी देण्यासाठी पास दिला जाणार आहे. हा पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध केला जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासालाही ग्राह्य धरले जाणार आहेत. या पासवर चालकाचे नाव, गाडी क्रमांक, जाण्याची व येण्याची तारीख आदी भरावे लागणार आहे.