गणेशमुर्तीच्या ‘जय मल्हार’ रूपाला अजूनही पसंती
By admin | Published: August 24, 2016 11:47 AM2016-08-24T11:47:49+5:302016-08-24T13:12:54+5:30
गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली असून बाप्पांच्या विविध रूपांमधील मुर्ती सध्या आकारास येत आहेत. या मुर्तीमध्ये अजूनही ‘जय मल्हार’ रूपातील बाप्पांच्या मुर्तीला भाविकांची पसंती आहे.
Next
प्रविण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ - गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली असून बाप्पांच्या विविध रूपांमधील मुर्ती सध्या आकारास येत आहेत. या मुर्तीमध्ये अजूनही ‘जय मल्हार’ रूपातील बाप्पांच्या मुर्तीला भाविकांची पसंती असल्याचे अकोल्यातील प्रख्यात मुर्तिकार किसन पेंढारकर यांनी सांगीतले. पेंढाकर हे गेल्या पाच दशकांपासुन मुर्तिकला व्यवसायात आहेत. दरवर्षी बाप्पांचे नव नवीन रूप साकारणा-या पेंढारकारांकडे यावर्षीही तब्बल १५ फुटाच्या जय मल्हार रूपातील बाप्पांच्या मुर्तीची मागणी गेल्यावर्षीप्रमाणचे कायम आहे. सध्या मुर्तिंवर अखेरचा हात फिरवणे सुरू आहे. प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मुर्ती न वापरता शाडूच्या मुर्ति वापरण्याबाबत जनजागृती जोरात सुरू असली मोठया आकाराच्या मुर्ती मातीने बनविण्यात अडचण असते. त्यामुळे नाईलाजाने प्लॉस्टर आॅप पॅरीसचा वापर करावा लागतो असे ते म्हणाले. यावर्षी मुर्तिच्या किंमतीही वाढलेल्या नाहीत त्यामुळे भक्तांना आपल्या आवडत्या बाप्पांना आवडत्या रूपात मोठया वाजत गाजत घरी नेता येणार आहे.