६ जूनपासून ‘मरे’च्या गणेशोत्सव विशेष ट्रेनचे आरक्षण

By Admin | Published: June 3, 2017 05:30 AM2017-06-03T05:30:26+5:302017-06-03T05:30:26+5:30

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या वतीने १४२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Ganeshotsav special train reservation from Murray on 6th June | ६ जूनपासून ‘मरे’च्या गणेशोत्सव विशेष ट्रेनचे आरक्षण

६ जूनपासून ‘मरे’च्या गणेशोत्सव विशेष ट्रेनचे आरक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या वतीने १४२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष ट्रेनचे आरक्षण ६ जूनपासून विशेष शुल्कासह सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
गणेशोत्सव काळात ट्रेन क्रमांक ०१४४५ (मुंबई-करमळी), ०१४४७ (सावंतवाडी-पुणे), ०१११३ (दादर-सावंतवाडी) आणि ०११८५ (दादर-रत्नागिरी) या ट्रेनमध्ये जनरल द्वितीय श्रेणी अनारक्षित डबे आहेत. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता, साध्या तिकीटदरात प्रवास करणे शक्य होणार आहे. रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून या विशेष ट्रेनचे आरक्षण करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गर्दीवर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने जादा ट्रेन चालवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या गाड्यांची बुकिंग फुल्ल झाल्याने मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष सेवा देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, या विशेष गाडीसाठी शुल्कासह आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Ganeshotsav special train reservation from Murray on 6th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.