कुख्यात गजा मारणोसह टोळी तडीपार
By admin | Published: August 30, 2014 11:09 PM2014-08-30T23:09:43+5:302014-08-30T23:09:43+5:30
कुख्यात गुंड गजा मारणो ऊर्फ महाराज याला त्याच्या संपूर्ण मारणो टोळीसह शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
Next
पुणो : कुख्यात गुंड गजा मारणो ऊर्फ महाराज याला त्याच्या संपूर्ण मारणो टोळीसह शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.
गणोशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मारणो याने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोथरूडमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली होती.
गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणो (वय 46, रा. एमआयटी कॉलनी, हमराज चौक, शास्त्रीनगर, कोथरूड) असे मारणो टोळीच्या प्रमुखाचे नाव आहे. मारणो याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमकी देणो, संघटित गुन्हेगारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मारणोच्या टोळीची शहरामध्ये मोठी दहशत आहे.
मध्यंतरीच्या काळात उसळलेल्या टोळीयुद्धामध्ये त्याच्या टोळीचा सक्रिय सहभाग होता.
त्याच्यासह बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (वय 25, रा. एमआयटी कॉलनी, हमराज चौक, कोथरुड), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 28, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड), गणोश नामदेव हुंडारे (वय 19, रा. शास्त्री कॉलनी, हमराज मंडळाजवळ, कोथरूड), शशांक मारुती बोडके (वय 23, रा. शास्त्रीनगर, कोथरुड), अमोल विनायक तापकीर (वय 22, रा. शास्त्रीनगर, कोथरुड), शेखर दत्तात्रय आडकर (वय 23, रा. तेजसनगर, मंत्री पार्कजवळ, कोथरुड), रूपेश कृष्णराव मारणो (वय 28, रा. हमराज चौकाजवळ, कोथरुड), अनंता ज्ञानोबा कदम (वय 27, रा.
रणपिसे चाळ, गुजराथ कॉलनी, कोथरुड), सुनील नामदेव बनसोडे (वय 31, रा. श्रीकृष्णनगर, कोथरुड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)
गजा मारणो याने त्याची टोळी तयार करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणो, दरोडा व संघटित गुन्हेगारी करणो अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील व फौजदारी अतिक्रमण अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्येही या टोळीचा सक्रिय सहभाग आहे. गेल्या काही दिवसांत या टोळीविरुद्ध पोलिसांकडे वारंवार तक्रारी येऊ लागल्या होत्या. तसेच, गुन्हेगारी क्षेत्रतील सक्रियताही वाढत चालली होती. त्यामुळे पोलिसांनी ही टोळीच तडीपार करण्याचा निर्णय घेतला. पुणो पोलीस आयुक्तालयाच्या तसेच जिल्हा पोलिसांच्या हद्दीमधून एक वर्षाकरिता सर्व गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
- एम. बी. तांबडे, पोलीस उपायुक्त परिमंडल एक