एक्स्प्रेस-वेवर लुटणारी टोळी गजाआड

By admin | Published: September 28, 2014 01:59 AM2014-09-28T01:59:59+5:302014-09-28T01:59:59+5:30

मुंबई-पुणो द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळच्या फूडमॉल येथे बसमधील प्रवाशांचे मोबाइल, लॅपटॉप, टॅबस् चोरणा:या तिघांना रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली.

Gang of express-wave gangs | एक्स्प्रेस-वेवर लुटणारी टोळी गजाआड

एक्स्प्रेस-वेवर लुटणारी टोळी गजाआड

Next
>अलिबाग : मुंबई-पुणो द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळच्या फूडमॉल येथे बसमधील प्रवाशांचे मोबाइल, लॅपटॉप, टॅबस् चोरणा:या तिघांना रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली. सालिम शफलत हुसेन (रा. गोवंडी, मुंबई), मोसीम अमीरउद्दीन अन्सारी (रा. उत्तर प्रदेश) व आसिफ अहमद अन्सारी (रा. मुंबई) या तिघांचा त्यात समावेश आहे. 
त्यांच्याकडून 6 मोबाइल, दोन लॅपटॉप आणि दोन टॅब जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली आहे. हे तिघे दादर येथून पुण्याकडे जाणा:या शिवनेरी व एशियाड बसमध्ये बसत. दादर - पनवेलच्या प्रवासात ते बसमधील प्रवाशांची व त्यांच्या जवळच्या मौल्यवान ऐवजाची रेकी (पाहणी) करीत. खोपोली जवळच्या फुडमॉल येथे या बसेस थांबल्यावर प्रवासी खाली उतरत. ही संधी साधत ही टोळी प्रवाशांचा किमती ऐवज घेऊन पोबारा करीत असे. त्यांनी 2क्11पासून अशा 3क्-35 चो:या केल्या आहेत. या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दादर येथूनच साध्या वेशात प्रवास सुरू केला. पनवेलर्पयत प्रवाशांचे निरीक्षण करताना त्यांना तीन प्रवासी संशयास्पद वाटले. या तिघांकडे स्वत:चे सामान नव्हते. बस खोपोली फूडमॉल येथे आल्यावर या तिघांनी प्रवाशांच्या किमती ऐवजाच्या बॅगा बसच्या कॅरियरमधून उचलल्या आणि उतरले. त्याच वेळी त्यांना पोलीस पथकाने  शिताफीने अटक केली.
 
च्अटक करण्यात आलेल्या तिघांची चौकशी केली असता चोरलेले मोबाइल, लॅपटॉप, टॅबसारख्या अन्य मौल्यवान वस्तू तत्काळ विक्रीसाठी ‘क्विकर डॉट कॉम’ वेबसाईटवर टाकत असल्याचे त्यांनी कबूल केले. आजवर फूडमॉलजवळ बसमध्ये अनेक चो:या केल्याची कबुली त्यांनी दिली. 

Web Title: Gang of express-wave gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.