पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:52 AM2024-10-05T06:52:00+5:302024-10-05T06:52:17+5:30
तरुणीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी शस्त्राच्या धाकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचे रेखाचित्र जारी केले आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाल्यानंतर तरुणीने स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. हा प्रकार दोघांनी मित्रांना सांगितला. त्यांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची चौदा पथके आरोपींच्या मागावर आहेत.
घाटात घडली घटना
पीडित तरुणी गुजरातमधील आहे. ती शहरातील इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेते तर मित्र जळगावचा आहे. तो सीएच्या अभ्यासक्रमाला आहे.
दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटात आले. तरुणीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते.
गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दाेघे घाटात गप्पा मारत थांबले होते. काही वेळाने दुचाकीवरून तिघे आले.
तिघांनी शस्त्राच्या धाक दाखवत मित्राला मारहाण केली. शर्टने हात तर बेल्टने पाय बांधून त्याला झाडाला बांधले. तरुणीलाही शस्त्राचा धाक दाखवत तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.