आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: January 19, 2015 04:29 AM2015-01-19T04:29:51+5:302015-01-19T04:29:51+5:30

उचल घेऊनही कामासाठी न आल्याच्या रागातून एका मुकादमाने ऊसतोडणी मजुराच्या कुटुंबातील तिघांसह तरुणीला घरात डांबून ठेवले

Gang rape on tribal woman | आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार

आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार

Next

बर्दापूर (जि. बीड) : उचल घेऊनही कामासाठी न आल्याच्या रागातून एका मुकादमाने ऊसतोडणी मजुराच्या कुटुंबातील तिघांसह तरुणीला घरात डांबून ठेवले. तसेच भावासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली़ या प्रकरणी मुकादम महादेव भागवतसह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, विशाल भागवत आणि मंदाकिनी भागवत हे फरार आहेत.
मुकादम महादेव भागवत याच्या टोळीत मध्य प्रदेशातील पाच कुटुंबाचा समावेश होता. दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी त्याला ही टोळी पाठवायची होती. ३ लाख रुपये उचलही या लोकांना देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे हे लोक भागवत याच्याकडे आले. परंतु त्यानंतर टोळीतील चार कुटुंबांतील लोक परस्पर निघून गेल्याने त्याला कर्नाटकात टोळी पाठविता आली नाही. पीडित तरुणीचे कुटुंब मध्य प्रदेशच्या मेरणा जिल्ह्यातील शहापूर येथून आले होते. त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नसल्याने ते याच परिसरात थांबले आणि दगड फोडण्याचे काम करू लागले. पाच दिवसांपूर्वी भागवत याने या कुटुंबातील लोकांकडे पैशांची मागणी करीत तरुणीसह दोन महिला आणि तिच्या भावाला सुगाव येथे आणले. त्याच्या घराजवळच एका खोलीत चौघांना डांबून ठेवले. दरम्यान, महादेव भागवत, पांडुरंग उर्फ पांडू राजेभाऊ फरताडे, अंगद विष्णू शिंदे, नानासाहेब चत्रभुज शिंदे, सुरेश त्रिंबक मस्के, विशाल महादेव भागवत यांनी पीडित तरुणीला दोन दिवसांपूर्वी रात्री १०च्या सुमारास तेथून शेतात नेले. तिच्या भावाने विरोध केल्याने त्याला बेदम मारहाण करून त्यालाही ते सोबत घेऊन गेले. शेतात चौघांनी तिला पाणी म्हणून मद्य पिण्यासाठी दिले. ती आणि तिचा भाऊ याला विरोध करू लागल्यावर चौघांनी त्या तरुणीला सिगारेटचे चटके दिले आणि भावाला चाबकाचे फटके देण्यात आले़ त्यानंतर चार नराधमांनी पीडित तरुणीवर तिच्या भावासमोरच अत्याचार केला. पहाटे पुन्हा या दोघांना घरी आणून त्यांना डांबून ठेवण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Gang rape on tribal woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.