दरोड्यांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

By admin | Published: February 1, 2017 07:10 PM2017-02-01T19:10:34+5:302017-02-01T19:10:34+5:30

पोलीस ठाणे हद्दीत दरोडयांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करण्यात पोलीसांना यश

The gang is ready for dacoity | दरोड्यांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

दरोड्यांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 1 - टेंभुर्णी (ता़ माढा) येथील पोलीस ठाणे हद्दीत दरोडयांच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. या टोळीकडून देशी बनावटीचा कट्टा, बोअरचा जिवंत राऊड, मोटारसायकल, लोखंडी कोयता, सुरा असा एकूण ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़ ही कारवाई सोेलापूर ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी, करमाळा, कुर्डूवाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना टेंभुर्णी करमाळा रोडवरील करमाळा चौक, टेंभुर्णी येथे सपोनि धुमाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत टेंभुर्णी ते करमाळा रोडवरील टोलनाक्याच्या पाठीमागे काही लोक दरोडा टाकण्याच्या इराद्याने बसले असल्याचे कळविले़ या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता यावेळी तेथे २ मोटारसायकलसह ५ जण थांबलेले मिळून आले़ यावेळी त्यांच्याकडून १ देशी बनावटीचा कट्टा, १ आठ एम़एम़बोअरचा जिवंत राऊड, १ मोटारसायकल, १ मोठा धारदार लोखंडी कोयता, १ लोखंडी सुरा, लाल मिरचीची पुड असा एकूण ४५ हजार २२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
 
याप्रकरणी राहुल जिगºया काळे, लखन उर्फ लख्या जिगºया काळे, किरण उर्फ खोब्यात जिगºया काळे, पप्पु निलकंठ काळे, सागर उचल्या भोसले यांच्याविरूध्द पोह गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
ही कामगिरी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि उमेश धुमाळ, पोह गोरखनाथ गांगुर्डे, पोना सुभाष शेंडगे, पोकॉ अरूण केंद्रे, सचिन मागाडे, सचिन गायकवाड, सागर शिंदे, पांडूरंग काटे, समीर खैरे, अमोल गावडे, ईस्माईल शेख यांनी बजावली.

Web Title: The gang is ready for dacoity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.