पोस्ट ऑफीसमध्ये अवतरली ‘गंगा’!
By admin | Published: August 22, 2016 05:00 PM2016-08-22T17:00:25+5:302016-08-22T17:00:25+5:30
हिंदू धर्मात अतिशय मानाचे स्थान असलेल्या पवित्र गंगाजलाची आता थेट पोस्ट ऑफीसमधून विक्री होत आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. २२ - हिंदू धर्मात अतिशय मानाचे स्थान असलेल्या पवित्र गंगाजलाची आता थेट पोस्ट ऑफीसमधून विक्री होत आहे. त्यामुळे ‘कशाला जाता गंगा,काशी...गंगाजल उपलब्ध आहे घरापाशी’ या ओळींचा प्रत्यय अनेकांना येत असून, पोस्ट ऑफीसमध्ये गंगा अवतरल्याचा अनुभव भाविक घेत आहेत.
भारतात श्रध्दाळूंची संख्या कमी नाही. भूमिला, नदीला माता मानण्याची परंपरा आजही अबाधित आहे. देशात गंगा नदीला अन्यन्यसाधारण महत्व असून, या नदीच्या जलाला तीर्थांचे स्थान आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपºयातील भाविक गंगोत्री, ऋषिकेश, पाटणा येथे जात, गंगास्रान करतात. सोबतच गंगानदीतील पवित्र जल सोबत घेवून येतात. अनेकांना हे भाग्य लाभत नाही, अशा भाविकांसाठी भाविकांनी घरपोच गंगाजल ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये गंगाजल विक्रीस उपलब्ध आहे. ऋषिकेश आणि गंगोत्री येथून गंगाजलाच्या बाटल्या उपलब्ध करण्यात येत असल्याने, आता पोस्ट ऑफीसमध्ये ‘गंगा’ अवतरल्याचा अनुभव भाविक घेत आहेत.
सर्वच पोस्ट ऑफीसमध्ये मिळणार गंगाजल!
उत्तराखंड टपाल खात्याने पोस्टातून गंगाजल विक्रीस सुरूवात केली. या उपक्रमाला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. १०० मिलीची बॉटल १५ रुपये, २०० मिलीची बॉटल २५ रुपयाला उपलब्ध आहे.