तरुणीवर सामूहिक बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 08:54 AM2017-03-19T08:54:12+5:302017-03-19T08:54:12+5:30

दक्षिण मुंबईत सारंगी इमारतीत एका 27 वर्षीय मुलीवर गुरुवारी रात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

Gangetic rape on the girl collapsed from the fifth floor in an attempt to rescue her | तरुणीवर सामूहिक बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली

तरुणीवर सामूहिक बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा परिसरात पायधुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक 27 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन डांबून ठेवले होते. नराधमाच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पायधुनी भागात शुक्रवारी पहाटे ही तरुणी जखमी अवस्थेत असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत सारंगी इमारतीत एका 27 वर्षीय मुलीवर गुरुवारी रात्री तिघांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. फारुख खान, संतोष कनोजिया आणि अकबर अशी या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी पडित तरुणीला सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. ही तरुणी उत्तरप्रदेशची रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत ती पायधुनीच्या एका इमारतीत दाखल झाली होती. या व्यक्तीनं काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिला आणलं होतं. इथं तिच्यावर दोन अनोळखी लोकांनी आत्याचार केला.

या तिघा नराधमांनी त्या मुलीला सारंगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डांबून ठेवले होते. नराधमांच्या तावडीतून तिने कसाबसा पळ काढला आणि तिथल्या शौचालयात जाऊन लपली. जीव वाचवण्यासाठी तिने त्या शौचालयाच्या खिडकीतून उडी मारली. यामुळे ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीची परिस्थीती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Gangetic rape on the girl collapsed from the fifth floor in an attempt to rescue her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.