डांबून ठेऊन तरूणीवर सामूहिक बलात्कार; चौघांना २० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2016 08:14 PM2016-07-14T20:14:53+5:302016-07-14T20:14:53+5:30
मध्यप्रदेशातील आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही हांडे यांनी २० वर्ष सक्तमजुरी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १४ - मध्यप्रदेशातील आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात चार आरोपींना दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्या. एस. व्ही हांडे यांनी २० वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ३ हजार रुपये दंड तसेच अन्य तिघांना सहा महिने कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी गुरुवारी ठोठावली.
मध्यप्रदेशातील ठेंगदा, ता. श्येवपूर, जि. मुरैना येथील पाच जणांचे आदिवासी कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातील दलालामार्फत अंबाजोगाई तालुक्यात आले होते. ऊसतोडणीसाठी या कुटुंबाची रवानगी सुगांव ता. अंबाजोगाई येथील मुकदम महादेव टोपाजी भागवत याच्याकडे झाली होती. यापैकी काही कुटुंबे पळून गेली होती. याचा राग धरुन मुकादम भागवत याने १३ ते १७ जानेवारी २०१५ या दरम्यान एका कुटुुंबाला डांबले. एवढेच नाही तर या कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. या घटनेला ग्रामस्थांनी वाचा फोडली. बर्दापूरठाण्यात ठाण्याच्या पोलिसांनी त्या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून महादेव टोपाजी भागवत, पांडुरंग राजाभाऊ परकाडे, अंगद विष्णु शिंदे, नानासाहेब चत्रभुज शिंदे, विशाल महादेव भागवत, मंदाकिनी महादेव भागवत (सर्व रा. सुगांव, ता. अंबाजोगाई व सुरेश विवेक मस्के (रा. भावठाणा, ता. अंबाजोगाई) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद कोला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे, सहायक निरीक्षक दिलीप जाधव, जमादार वशिष्ट कांगणे यांच्या पथकाने सर्व आरोपीस अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
१७ साक्षीदार तपासले
सरकारी वकील दिलीप चौधरी यांनी या प्रकरणी एकूण १७ साक्षीदार तपासले. यात पीडित तरुणी, तिची आई व डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर झाल्याने न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी त्यांना दोषी ठरवले. महादेव टोपाजी भागवत, पांडुरंग राजाभाऊ परकाडे, अंगद विष्णु शिंदे, नानासाहेब छत्रभुज शिंदे या चौघांना २० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तर सुरेश विवेक मस्के, विशाल महादेव भागवत, मंदाकिनी महादेव भागवत याांना सहा महिने कैद व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.