नागपुरात निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: April 24, 2017 03:23 AM2017-04-24T03:23:45+5:302017-04-24T03:23:45+5:30

सुधारगृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (१६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. या घृणास्पद कृत्यासाठी अन्य दोघांनी

Gangraped girl in Nagpur | नागपुरात निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपुरात निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार

Next

नागपूर : सुधारगृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (१६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. या घृणास्पद कृत्यासाठी अन्य दोघांनी त्या चार नराधमांना मदत केली. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी सहाही आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. आमदार निवासातील सामूहिक बलात्कार प्रकरण ताजे असताना पुन्हा सामूहिक बलात्काराची घडल्याने उपराजधानीत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. माता-पित्याच्या निधनानंतर ती ९ वर्षांची असताना तिच्या नातेवाईकांनी तिला श्रद्धानंद अनाथालयात आणून सोडले. गेल्यावर्षी तेथून ती काटोल मार्गावरील सुधारगृहात पोहचली.
२० एप्रिलच्या सकाळी तिच्यासह
४ अल्पवयीन मुली तेथून पळून गेल्या. त्या रात्री सीताबर्डीतील एका दुकानाच्या आडोशाला थांबल्या आणि २१ एप्रिलला सकाळी तिघी निघून गेल्या. पीडित मुलगी याच भागात थांबली.
रात्री १० वाजता ती सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मॉलनजीक फुटपाथवर बसून भूकेने व्याकुळ होऊन रडत होती. आरोपी फिरोज अहमद (४०), त्याच्या दुकानातील नोकर मयूर बारसागडे (२३), नरेश जनबंधू (२२) आणि स्वप्नील देवानंद जवादे (२७) तिच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी जेवणाचे आमिष दाखवून तिला आरोपी चिंट्याच्या आॅटोत बसवले. त्यानंतर सुगतनगर, जरीपटक्यातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सदनिकेत नेले. तेथे तिच्यावर चौघांनी रात्रभर बलात्कार केले. पहाटे ४ च्या सुमारास आरोपींनी तिला आॅटोत बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले. शनिवारी सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला. विचारपूस केली असता तिने अत्याचाराची कैफियत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी चार मुख्य आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या सौमिल नरखेडकर आणि प्रलय मेश्राम या दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Gangraped girl in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.