गॅँगस्टर कुमार पिल्लेचे प्रत्यार्पण

By Admin | Published: June 28, 2016 04:04 AM2016-06-28T04:04:49+5:302016-06-28T04:04:49+5:30

सिंगापूरला गेलेल्या मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसच्या पथकाने सोमवारी रात्री गँगस्टर कुमार पिल्लेला मुंबईत आणले.

Gangster Kumar Pillay's extradition | गॅँगस्टर कुमार पिल्लेचे प्रत्यार्पण

गॅँगस्टर कुमार पिल्लेचे प्रत्यार्पण

googlenewsNext


मुंबई : सिंगापूरला गेलेल्या मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएसच्या पथकाने सोमवारी रात्री गँगस्टर कुमार पिल्लेला मुंबईत आणले. त्याला पुढील तपासासाठी गुन्हे शाखेच्या कक्ष ७ कडे सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुमार पिल्लेवर मुंबईत हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्रास्त्रे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला १५ जानेवारी रोजी सिंगापूर येथे अटक केल्यानंतर त्याचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले. सोमवारी रात्री एअर इंडीयाच्या विमानाने ते पिल्लेला घेऊन मुंबईत आले. सिंगापूर सरकारशी गुन्हेगार हस्तांतर करार नसल्याने, अडचणी येत होत्या. मात्र पिल्ले सराईत गुन्हेगार असल्याचे गुन्हे शाखेने पटवून दिले होते. धनंजय कुलकर्णी यांच्या तपास पथकाने सोमवारी त्याला मुंबईत आणले.

Web Title: Gangster Kumar Pillay's extradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.