गंगूबाई ९४व्या वर्षी सरपंचपदी

By admin | Published: September 7, 2016 01:25 AM2016-09-07T01:25:14+5:302016-09-07T01:25:14+5:30

खेड तालुक्यातील ढोरे-भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची मंगळवारी ९४ वर्षांच्या आजीबार्इंनी सूत्रं हाती घेतली.

Gangubai sirpanchadhi on 94th year | गंगूबाई ९४व्या वर्षी सरपंचपदी

गंगूबाई ९४व्या वर्षी सरपंचपदी

Next

दावडी : खेड तालुक्यातील ढोरे-भांबुरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची मंगळवारी ९४ वर्षांच्या आजीबार्इंनी सूत्रं हाती घेतली. गावकऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून दिले आहे.
गंगूबाई निवृत्ती भांबुरे असे त्या आजीबाई सरपंचांचे नाव आहे. गंगुबाई अंगठेबहाद्दर असल्या, तरी उपजत शहाणपणामुळे आता गावचा गावगाडा हाकणार आहेत. यामुळे पंचक्रोशीत व गावासाठी हा कौतुकाचा विषय ठरला आहे.
ढोरे-भांबुरवाडी हे गाव राजगुरुनगर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. जरेवाडी, ढोरेवाडी, खालची भांबुरवाडी या गावाची संयुक्त ग्रामपंचायत आहे. गावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. आठ महिन्यांपूर्वी गंगूबाई ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर सरपंचपदी सुमित्रा ढोरे या काम पाहात होत्या. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंचपदाची जागा रिक्त होती. मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी निवडणूक झाली. 

Web Title: Gangubai sirpanchadhi on 94th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.