फोन कॉलवर गांजा : माफियांची नवीन शक्कल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:36 AM2017-08-11T06:36:01+5:302017-08-11T06:36:04+5:30

पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Ganja on phone call: new concept of mafia | फोन कॉलवर गांजा : माफियांची नवीन शक्कल  

फोन कॉलवर गांजा : माफियांची नवीन शक्कल  

Next

- नामदेव मोरे 
नवी मुंबई : पोलिसांच्या धाडसत्रामुळे शहरातील प्रमुख गांजा अड्डे बंद झाले असले तरी विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. नियमित ग्राहकांनी फोनवर मागणी केली की काही क्षणात गांजा पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शहरातील तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकविणाºया या माफियांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
सारसोळे सेक्टर ६ मधील जय दुर्गामाता भाजी मंडईमध्ये दोन दिवसांपूर्वी ७ ते ८ तरूण गांजा ओढत बसले होते. महापालिकेचे हे मार्केट मद्यपी व गांजा ओढणाºयांसाठीच बांधले असल्याची भावना नागरिकांमध्ये होवू लागली आहे. गांजा ओढत असतानाच या तरूणांनी शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या धाडसत्राविषयी चर्चा सुरू केली. सेक्शन गरम आहे. पोलिसांनी नेरूळमधूनच ३९ किलो गांजा जप्त केला आहे. एपीएमसीमध्येही महिलेला अटक केली आहे. अनेक ठिकाणचे गांजा अड्डे बंद झाले आहेत. पण आपल्याला टेंशन नाही. आपण एक फोन केला की तत्काळ गांजा मिळतो. पोलिसांच्या कारवाईमुळे गांजाचे दर वाढले असल्याचीही चर्चा या तरूणांमध्ये सुरू झाली होती. याविषयी ‘लोकमत’ने माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता शहरामध्ये फोनवरून गांजाची आॅर्डर घेण्याचा नवीन ट्रेंड विकसित झाला असल्याचे समजले. एपीएमसीमध्ये गांजा विकणारा पप्या, तुंडा हे आता एमआयडीसी परिसरामध्ये वास्तव्य करत आहेत. नियमित ग्राहकांनी फोन केला की त्यांना निर्मनुष्य ठिकाणी बोलावून गांजा दिला जात आहे. तुर्भे रेल्वे स्टेशनसमोरील एका किराणा दुकानामध्ये व हनुमान नगरमध्ये लालीचा अड्डाही अद्याप सुरूच असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नेरूळ व सीवूडमध्ये सहजपणे गांजा उपलब्ध होवू लागला आहे. बालाजी टेकडी परिसरामध्ये एक महिला व काही मुले गांजा विकत आहेत. मोटारसायकलवरून आलेले तरूण या परिसरामध्ये फिरून व्यवसाय करणाºयांकडून गांजा विकत घेत आहेत. बालाजी टेकडीवरील चर्चकडच्या पायरी मार्गाने खाली उतरले की शेवटच्या झोपडीमध्ये गांजा विक्री केला जात आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही तेथील अड्डा बंद झालेला नाही. खुलेआम सुरू असलेल्या अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. गांजा विक्री करणारे कारवाईच्या भीतीमुळे स्वत:जवळ जास्त साठा ठेवत नाहीत.
छोट्या पुड्या वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवल्या जात असून मागणीप्रमाणे त्या विकल्या जात असल्याचे निदर्शनास येत असून हे सर्व व्यवसाय बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

कारवाईची मागणी
शहरामध्ये यापूर्वी एपीएमसी परिसरामध्ये गांजा विक्री करणारा पप्या व तुंडा एमआयडीसीत फोनवरून आॅर्डर घेवून गांजा विक्री करत आहे. तुर्भे स्टेशनसमोर एक अड्डा अद्याप सुरू असून हनुमान नगरमध्ये बंद झालेला अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. नेरूळ एल. पी. पुलाजवळील शिवाजीनगर झोपडपट्टीमध्ये दोन ठिकाणी गांजा विकला जात आहे. नेरूळमधील बालाजी टेकडी परिसरातील झोपडीमध्ये एक महिला व टेकडी परिसरामध्ये काही मुले फोनवर आॅर्डर घेवून गांजा विकत असल्याची माहिती काही गांजा विकणाºया तरूणांनीच दिली.

पोलिसांसमोर आव्हान
गांजा व इतर अमली पदार्थांचे प्रमुख अड्डे उद्ध्वस्त झाले असले तरी प्रत्यक्षात मात्र अद्याप गांजा विक्री बंद झालेली नाही. नेरूळ सेक्टर ६ मधील जय दुर्गामाता भाजी मंडई, कोपरखैरणेत दोन ठिकाणी व इतर परिसरामध्येही तरूण खुलेआम गांजा ओढत असतात. त्यांच्यावर कारवाई करावी व गांजा पुरविणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Ganja on phone call: new concept of mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.