गणोश मंडळांची नजर आता ‘वीकेण्ड’वर
By admin | Published: September 4, 2014 02:37 AM2014-09-04T02:37:08+5:302014-09-04T02:37:08+5:30
मुंबईत यंदा गणोशोत्सवाचा उत्साह असला, तरी पावसाच्या संततधारेमुळे गणोशभक्तांचा पूर मात्र ओसरताना दिसला आहे.
Next
मुंबई : मुंबईत यंदा गणोशोत्सवाचा उत्साह असला, तरी पावसाच्या संततधारेमुळे गणोशभक्तांचा पूर मात्र ओसरताना दिसला आहे. त्यामुळे गणोशभक्तांच्या प्रतीक्षेत असलेल्या सार्वजनिक मंडळांना शेवटच्या वीकेण्डला तरी भाविक दर्शनासाठी गर्दी करतील, अशी आशा आहे.
मुंबई शहरातील गिरगावपासून गिरणगावार्पयत आणि पश्चिम व पूर्व उपनगरात अनेक नामांकित सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे आहेत. भव्यदिव्य देखावे, आकर्षक गणोशमूर्ती आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणा:या चलतचित्रंच्या माध्यमातून या मंडळांनी गणोशभक्तांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. दरवर्षी हजारो ते लाखो गणोशभक्त या मंडळांना भेटी देत असतात.
यंदा गणोशोत्सव काळात 2 वीकेण्ड आले. मात्र पहिल्याच वीकेण्डला आणि एकूणच पहिल्या पाच दिवसांत भाविकांनी म्हणाव्या तितक्या संख्येने गर्दी केली नसल्याची खंत मंडळांनी व्यक्त केली आहे. पावसाची संततधार हे त्यामागील मुख्य कारण असल्याचा मंडळांचा अंदाज आहे. मात्र दुस:या वीकेण्डर्पयत सात दिवसांच्या घरगुती गणपतींचेही विसजर्न होईल. त्यामुळे दुस:या वीकेण्डला गर्दी होईल, असा अंदाज मंडळे व्यक्त करत आहेत.
12 ज्योतिर्लिगांचे दर्शन देणारा ‘फोर्टचा राजा’
सुंदर सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या फोर्ट येथील ‘फोर्टचा राजा’ या गणोशोत्सव मंडळाने या वर्षी बारा ज्योतिर्लिगांच्या देवळांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. सीएसटी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मंडळातील गणपती पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.
रंगारी बदक चाळीचा ‘लक्ष्मीदीप महाल’
काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ येथील गणोशोत्सव मंडळाने या वर्षी देखाव्यांची मालिका खंडित करून ‘लक्ष्मीदीप महाला’ची प्रतिकृती साकारली आहे. (प्रतिनिधी)
मुंबईच्या राजाची ‘जेजुरी’
मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लालबाग येथील गणोश गल्लीमधील लालबाग सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदा विशेष आकर्षण म्हणून जेजुरी नगरीची प्रतिकृती साकारली आहे. गल्लीत प्रवेश केल्यावर गणोशभक्तांना तत्काळ खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला पोहोचल्याचा भास होतो, इतकी हुबेहूब प्रतिकृती मंडळाने साकारली आहे.
भव्यदिव्य ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’
भव्य आणि आकर्षक मूर्तीसाठी नावाजलेला चिंचपोकळी येथील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गेल्या काही वर्षात गणोशभक्तांचा केंद्रबिंदू बनला आहे. चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे वीकेण्डलाही या ठिकाणी मोठय़ा संख्येने भक्तांचा महापूर उसळण्याची शक्यता आहे.
आज गौरी-गणपतीचे विसजर्न : सात दिवसांच्या घरगुती गणपतींसोबत गुरुवारी गौरी-गणपतींचे विसजर्न होणार आहे. गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा चौपाटीसह, भाऊचा धक्का, गेट वे ऑफ इंडिया अशा वेगवेगळ्या ठिकाणी हजारो गणपतींचे विसजर्न करण्यात येते.
अंधेरीच्या राजाच्या सेवेला ‘मेट्रो’
पश्चिम उपनगरातील अंधेरीतील आझाद नगर सार्वजनिक गणोशोत्सव समिती मंडळाचा ‘अंधेरीचा राजा’ म्हणून परिचित असलेला गणपती पाहण्यासाठी पूर्व उपनगरातील भक्तही मोठय़ा संख्येने गर्दी करण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे या गणपतीच्या दर्शनासाठी पूर्व उपनगरातील भाविकांना सोयीची वाट निर्माण झाली आहे. त्यामुळे मेट्रोची सफर आणि अंधेरीच्या राजाचे दर्शन असा दुहेरी आनंद भाविकांना लुटता येणार आहे.