डोंबिवली पत्रकार संघावर गायकवाड, मोर्ये यांची निवड
By admin | Published: January 7, 2017 04:00 AM2017-01-07T04:00:18+5:302017-01-07T04:00:18+5:30
डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे आकाश गायकवाड, तर उपाध्यक्षपदी ‘लोकमत’च्या जान्हवी मोर्ये ेयांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
डोंबिवली : डोंबिवली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे आकाश गायकवाड, तर उपाध्यक्षपदी ‘लोकमत’च्या जान्हवी मोर्ये ेयांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.
पत्रकार दिनानिमित्त डोंबिवली पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार महेंद्रभाई ठक्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर, २०१७-१८ वर्षासाठी संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, सचिव अजय निकते (जनमत) आणि कोषाध्यक्षपदी महावीर बडाला (प्रात:काल) यांची बिनविरोध निवड झाली.
या वेळी मावळते अध्यक्ष विकास काटदरे यांनी संघाची पुढील सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष गायकवाड यांच्या हाती सोपवली. दरम्यान, महापालिकेतील नूतनीकरण केलेल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन ठक्कर आणि काटदरे यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)