कचरा वाहतोय ओसंडून
By admin | Published: July 22, 2016 12:50 AM2016-07-22T00:50:33+5:302016-07-22T00:50:33+5:30
शत्रुंजय मंदिर ते मार्केट यार्ड रस्त्यावर असलेल्या श्रीराम कॉलनी समोर संपूर्ण परिसरातील घाण कचरा आणून टाकण्यात येत आहे
भदन्त धम्मदीप महाथेरो यांचे प्रतिपादन : चिखली येथील पर्यटनस्थळी वर्षावास कार्यक्रम, वृक्षारोपण
भंडारा : मनाची शुद्धी करुन पाच इंद्रियांना संयमित करा, त्यातच कल्याण आहे. या वर्षावासात बौद्ध- उपासक- उपासिकांना फावल्या वेळात धम्म समजावून द्यावा. तथागत बुद्ध उत्तम पर्यावरणवादी होते. ते सारनाथचे चारमुंडी सिंह भारताच्या राजमुद्रेवर आहे. राष्ट्रध्वजावर धम्मचक्र आहे, ही बाबासाहेबांची राज्यघटना क्रांतीची मशाल आहे, असे प्रतिपादन बोधिचेतिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भदन्त डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी केले.
बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा राजेगाव एमआयडीसी भंडारा स्थित पर्यावरण स्थळी मंगळवार रोजी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन पर्व, वर्षावास अनुष्ठान, वृक्षारोपण, वनमहोत्सव, भोजनदान कार्यक्रमात ते बोलत होते. भदंत अॅड. शुभंकर यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले. वर्षावास भिक्षुंसाठी किती प्रेरणादायक आहे यांची माहिती उपस्थितांना दिली.
बुद्धाने लुंबिनी वनात शालवृक्षाखाली जन्म घेवून, बोधगया येथे बोधिवृक्षाखाली सम्यक् सम्बोधी प्राप्त केली. आषाढ पौर्णिमेला पंचवर्गिय परिव्राजकांना पहिला उपदेश करुन धम्मचक्र प्रवर्तन केले, आषाढ पौर्णिमेला गृहत्याग करुन कपिलवस्तुला शेवटचे वंदन केले. पंचवर्गिय भिक्षुसोबत त्याच इसिपतन मृगदाय वन, सारनाथच्या वनांत आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास करुन ६१ अर्हत भिक्षु तयार करुन तथागतांनी धम्मघोषणा केली. ब्रम्हचर्य सांभाळा कितीही त्रास सहन करुन आचरणशील व्हा. माझ्या सिंहासारखा बुद्धीवादी धम्माची पेरणी करा. लोक ईश्वर, आत्मा परमात्मा, अंधश्रध्देत गुंतलेले आहेत, त्यांना चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग समाजावून दु:खातून मुक्त करा, असे आवाहन तथागत गौतम बुध्दांनी केले, असे बोधिचेतिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भदन्त धम्मदीप यांनी सांगितले.
यावेळी प्रा.वासंती सरदार व प्रा. पुरुषोत्तम तिरपुडे यांनी शिका, संघटित व्हा, संषर्घ करा, या बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करुन दिली.
यावेळी जी. एम. उके, देवानंद नंदेश्वर, प्रदीप वासनिक, देवदास देशपांडे, सिताराम सुर्यवंशी, इंजि. प्रभाकर बुंदेले, अशोक देशपांडे, हरदास वाहने, पेंटर राजु वाहणे, अमरदीप बोरकर, मंगेश शेंडे, सिताराम वासनिक, मारोती करवाडे, मोहन शहारे, रुस्तम बोरकर, विनोद बोरकर, दिनेश रामटेके, रामकृष्ण कांबळे, बित्सोक साखरे, मनोज वासनिक, राजु पोटवार, नामदेव काणेकर, अमन तागडे, बाबूराव तागडे, सरदार गुरुजी, समिर वासनिक, काव्य नंदेश्वर, जिविका नंदेश्वर,सुषमा वासनिक, रत्नमाला वासनिक, चांगुना कांबळे, कुंदा बारसागडे, शारदा बारसागडे, अर्चना खोब्रागडे, देवांगणा फुले, जयश्री चवरे, गिता उके, सुर्यकांत डोंगरे, वैशाली बागडे, स्वर्णमाला गजभिये, सीमा वासनिक, लता उके, शितल उके, शिला साखरे, कविता पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)