एचए मैदानात कचरा

By admin | Published: May 30, 2016 01:47 AM2016-05-30T01:47:01+5:302016-05-30T01:47:01+5:30

येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) मैदानावर नागरिक आणि विक्रेतेकचरा टाकतात.

Garbage in the hay ground | एचए मैदानात कचरा

एचए मैदानात कचरा

Next


नेहरुनगर : येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) मैदानावर नागरिक आणि विक्रेतेकचरा टाकतात. त्या कचऱ्याला आग लावत असल्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी वायुप्रदूषण वाढत आहे.
येथील एचए मैदानावर काही दिवसांपासून नागरिक, व्यापारी, विक्रेते या मैदानाच्या मोकळ्या जागेत कचरा टाकतात. त्या कचऱ्याला आग लावत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर होत आहे. नेहरुनगर-महेशनगर रस्त्यावरील वाहनचालकांना या धुराचा त्रास होत आहे. धुरामुळे रस्ता व्यवस्थित दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच कचऱ्यामधील प्लॅस्टिक वस्तू जाळल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, वायुप्रदूषणात भर पडत आहे. या दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर दंण्डात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
>नेहरुनगर येथील मोकळ्या मैदानावर अनेक नागरिक कचरा आणून टाकत असल्यामुळे या मैदानाला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी असलेल्या कचऱ्याला एका अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे आग पसरली होती. अग्निशामक दलाने ती विझवली. कचरा टाकणाऱ्या व जाळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Garbage in the hay ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.