कचरा समस्या पेटणार!

By Admin | Published: August 6, 2014 11:30 PM2014-08-06T23:30:39+5:302014-08-06T23:30:39+5:30

शहरातील कचरा उरूळी देवाची येथील कचराडेपोत टाकला जात असला, तरी महापालिकेने या ठिकाणच्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कोटय़वधींचा खर्च केला आहे.

Garbage Problems Tumble! | कचरा समस्या पेटणार!

कचरा समस्या पेटणार!

googlenewsNext
>पुणो : शहरातील कचरा उरूळी देवाची येथील कचराडेपोत टाकला जात असला, तरी महापालिकेने या ठिकाणच्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कोटय़वधींचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ वारंवार आंदोलन करीत असल्याने पालिका प्रशासनाने पोलीस आयुक्तांशी चर्चा करून हे आंदोलन मार्गी लावावे, असे आदेश महापालिकेतील पक्षनेत्यांनी आज (बुधवार) पालिका प्रशासनास दिले. 
 
वेळ पडल्यास या गावांना दिले जाणारे पाणी आणि त्या ठिकाणच्या मुलांना देण्यात आलेल्या नोक:यांबाबतही विचार करण्याची वेळ आली असल्याची भूमिका या बैठकीत पक्षनेत्यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रंनी दिली. 
त्यामुळे महापालिकेने आंदोलनाबाबत ताठर भूमिका घेतल्यास कचरा 
आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वारंवार सूचना देऊनही महापालिकेकडून उरुळी देवाची येथील कचरा डेपोच्या ठिकाणी ओपन डंपिंग सुरू आहे. तसेच महापालिकेकडून शहराच्या चारही दिशांना कचरा डेपो सुरू करण्याचे आश्वासन देऊनही त्याबाबत 
काहीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी आजपासून डेपोवर येणा:या शहरातील कचरागाडय़ा अडविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परिणामी शहरात कच:याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पावसाळा सुरू असल्याने शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर आज पक्षनेत्यांची बैठक झाली. 
या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाबाबत तीव नाराजी व्यक्त केली. कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. असे असतानाही, ग्रामस्थ वारंवार आंदोलन करून महापालिकेने विविध मागण्या करीत आहेत. 
ही बाब चुकीची असल्याने त्यावर प्रशासनाने आता गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना या बैठकीस 
उपस्थित असलेल्या प्रशासनाच्या अधिका:यांना देण्यात आल्या. 
ही समस्या सोडविण्यासाठीचे सर्व अधिकार पक्षनेत्यांनी आयुक्तांना दिले असल्याने वेळप्रसंगी प्रशासनाने पोलीस आयुक्तांशी चर्चा करून या आंदोलनाबाबत मार्ग काढावा तसेच वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात कचरा न्यावा, असे आदेश देण्यात आल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले आहे. 
                                (प्रतिनिधी) 
 
4पक्षनेत्यांच्या या भूमिकेबाबत महापौर चंचला कोद्रे यांनी बोलण्यास नकार दिला. अशी मागणी झाली असली, तरी त्याची गरज पडणार नसल्याचे कोद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच या आंदोलनाबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. मात्र, सध्या निर्माण झालेली कचराकोंडी सोडविण्याबाबत काय उपाय करणार याबाबत कोद्रे यांना काहीच सांगता आले नाही.
 
..तर पोलीस बंदोबस्त
पुणो : पक्षनेत्यांची बैठक होताच महापालिका प्रशासनाकडून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरार्पयत बैठकांचे सत्र सुरू होते. या बैठकीनंतर उरुळी येथील कचरा डेपोच्या ठिकाणी कचरा कँपिंगसाठी घेऊन जाण्यास पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचे पत्र पोलीस आयुक्तांना देण्यात येणार आहे. तसेच वेळ पडल्यास तत्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. 
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी बुधवारपासून कचरा बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे अधिकार महापौरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. तसेच आज झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत वेळ पडल्यास पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षनेत्यांच्या या बैठकीनंतर प्रभारी आयुक्तपदाचा पदभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रशासनाच्या अधिका:यांची बैठक घेतली. या बैठकीत आजच्या दिवसभराच्या स्थितीचा आढावा त्यांनी घेतला. पर्यायी उपाययोजनांची चाचपणी करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या पत्रनुसार, शहरातील निर्माण होणारी कचरा समस्या लक्षात घेऊन संबंधितांना बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
 
4या बैठकीत शहरातील सर्व कच:यावर प्रक्रिया करणो शक्य नसल्याने काही कचरा डेपोमध्ये कँपिंगसाठी घेऊन जाण्यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, त्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने गरज पडल्यास पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली. त्यानंतर तत्काळ पोलीस आयुक्तांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Garbage Problems Tumble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.