जुन्या शौचालयाच्या जागी बनणार गार्डन; उल्हासनगर महापालिका गार्डन गृहसंकुलात नव्हे तर बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:04 PM2021-11-01T18:04:30+5:302021-11-01T18:05:25+5:30
महापालिका जुन्या शौचालयाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्या जागी गार्डन बनविण्याच्या प्रस्तावावर मंजुरी देण्यात आली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका जुन्या शौचालयाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्या जागी गार्डन बनविण्याच्या प्रस्तावावर मंजुरी देण्यात आली. दरम्यान मंजूर गार्डन एका गृहसंकुलात बांधण्याचा आरोप झाल्याने, ठेकेदाराला याबाबत नोटीस दिल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ ओटी सेक्शन भागातील एका खाजगी गृहसंकुलात प्रस्तावित गार्डन बांधण्यात येत असल्याच्या वादातून ठेकेदार व महिला सामाजिक कार्यकर्त्या यांच्यात हाणामारी झाली. गृहसंकुलाच्या बाहेरील जागेवर गार्डनची बांधणी न होता. गृहसंकुलाच्या खाजगी जागेवर गार्डनची बांधणी होत असल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग वादात सापडला. अखेर बांधकाम विभागाचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी ओटी सेक्शन परिसरातील एका खाजगी गृहसंकुलाबाहेर एक जुने मोडकळीस आलेल्या शौचालयाच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून, तेथे लहानसे गार्डन बांधण्याच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी दिली. दरम्यान महापालिका निधीतून गार्डनची बांधणी शौचालयाच्या जागे ऐवजी, एका खाजगी गृहसंकुलात करीत असल्याचा आरोप झाला. मात्र त्यात तथ्य नसून गार्डन प्रस्तावित जागेवर होणार असल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.
महापालिका १० लाखाच्या निधीतून शौचालयाच्या जागी गार्डनची बांधणी होणार असून खाजगी गृहसंकुलात झालेल्या बांधकामासी महापालिकेचा काहीएक संबंध येत नाही. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. तसेच ठेकेदार व सामाजिक कार्यकर्त्या यांच्यातील वाद वैयक्तिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी महापालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नाईकवाडे यांनी पत्रकारांना दिली.