आता लसणाची फोडणी महागली; महिनाभर तेजीच, किलोला ३२५ रुपये भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:24 AM2023-12-05T07:24:32+5:302023-12-05T07:25:14+5:30

मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी १४९ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातवरून आवक सुरू आहे.

Garlic, an important vegetable ingredient, has become scarce across the state. | आता लसणाची फोडणी महागली; महिनाभर तेजीच, किलोला ३२५ रुपये भाव

आता लसणाची फोडणी महागली; महिनाभर तेजीच, किलोला ३२५ रुपये भाव

नवी मुंबई : मसाल्याच्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे मुंबई बाजार समितीमध्ये ११० ते १८० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. पुण्यामध्ये होलसेल बाजारात हेच दर १०० ते २७० रुपयांवर आहेत. किरकोळ बाजारात लसूण २५० ते ३२५ रुपयांवर पोहोचला आहे. पुढील महिनाभर तेजी कायम राहणार आहे. 
मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी १४९ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातवरून आवक सुरू आहे. 

कुठे होते उत्पादन?
देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेशमध्ये होते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा परिसरात लसणाचे उत्पादन घेतले जाते.

...तोवर तेजी कायम
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो. लसणाचा साठा कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे. लसणाचा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत तेजी कायम राहणार आहे. 

Read in English

Web Title: Garlic, an important vegetable ingredient, has become scarce across the state.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.