थेरगावात गॅस स्फोटात घर उडाले
By admin | Published: August 4, 2014 11:53 PM2014-08-04T23:53:24+5:302014-08-04T23:53:24+5:30
पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या स्फोटाने थेरगाव परिसरात सोमवारी एकच खळबळ उडाली.
Next
वाकड : पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या स्फोटाने थेरगाव परिसरात सोमवारी एकच खळबळ उडाली. दत्तनगर येथे सोमवारी पहाटे घरगुती गॅसचा स्फोट झाल्याने क्षणार्धात संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले असून, एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली.
संजय काळे (वय 35) हे गंभीर जखमी असून, त्यांची प}ी सुजाता काळे (वय 31) यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर त्यांची मुले अथर्व (वय 1क्) व शुभम काळे (वय 2) हे किरकोळ जखमी आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरू होती. अचानक मोठा आवाज झाला. परिसरातील
नागरिक भूकंप झाल्याच्या भीतीने घराबाहेर पळाले. काही वेळानंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले. समोरील दृश्य पाहून क्षणाचाही विलंब न लावता अनेक तरुण मदतीसाठी धावून आले.
या घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी, तसेच पिंपरी, हिंजवडी, एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. तोर्पयत अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले होते. परंतु सुजाता काळे यांचे पाय इमारतीच्या स्लॅबखाली अडकल्याने जवानांनी स्लॅब तोडून त्यांना बाहेर काढले. स्थानिकांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी समाधान व्यक्त केले.
यामध्ये रोहिदास धुमाळ, संदीप येळवंडे, साहेबराव पुजारी, किरण गायकवाड, संदीप बरगे, रणधीर शिंदे, ऋषिकेश सावंत, संजय असवले, कुणाल तारू या तरुणांसह स्थानिकांनी मदत केली.
जखमींना जवळील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविले. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही; परंतु हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशामक व पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास वाकडचे सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे करीत आहेत. दरम्यान अशा घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेणो गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांना व्यक्त केले. (प्रतिनिधी)
4थेरगाव- दत्तनगरचा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. येथे चाळ पद्धतीची जुनी बांधकामे आहेत. काहींनी लोडबेअरिंगने एक मजली इमारती उभारल्या आहेत. दुर्घटना घडलेले बांधकामदेखील याच पद्धतीने वीट-मातीचा वापर करून बांधलेले होते. त्याला पोटामाळाही होता. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, क्षणातच घर जमीनदोस्त झाले. तसेच परिसरातील काही इमारतीच्या काचा फुटल्या. तसेच भितींनाही तडे गेले आहेत.
4छाया शिंदे यांच्या मालकीचे हे घर असून, मूळचे नगरचे असलेले शिंदे कुटुंबीय 3क् वर्षापासून थेरगाव, दत्तनगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्या रुग्णालयात नोकरीस असून या इमारतीतील एका घरात त्यांची मुलगी सुजाता, जावई संजय व दोन नातवंडे तर शेजारच्याच खोलीत छाया यांच्यासह त्यांची सून स्वाती सुनील शिंदे व सार्थक हा दोन वर्षांचा नातू असे दोन कुटुंबे स्वतंत्र राहायला आहेत. पहाटे स्फोट झाल्याने त्यांच्याही घराला तडे गेले आहेत. संजय काळे खासगी वाहनावर चालक आहेत.
4गॅसच्या स्फोटात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. घराच्या मातीचा ढीग अन् त्याखाली अडकलेले घरगुती वापराचे साहित्य केवळ डोळ्यांना दिसत आहे. दुसरीकडे कुटुंबातील सर्वच सदस्य जखमी झाल्याने या कुटुंबावर दुहेरी संकट ओढवले आहे. पावसाच्या दिवसातच डोक्यावरील छप्पर गेल्याने निवारा कोठे शोधायचा, असा प्रश्न काळे कुटुंबीयांपुढे आहे.
4सिलिंडर घेतल्यानंतर रेग्युलेटर जोडायच्या कॉकमध्ये पाणी ओतून पाहावे. त्यामधून बुडबुडे आल्यास सिलिंडर परत करावा.
4रेग्युलेटर व्यवस्थित बसवावा.
4रात्रीच्यावेळी रेग्युलेटर बंद करावा.
4स्टीलचे आवरण असलेला गॅस पाईप बसवावा.
4शेगडी वेळोवळी स्वच्छ करावी जेणोकरुन गंज चढून खराब होणार नाहीत
4सिलिंडरवरील दिनांक तपासावा.
4गॅसचा वास आल्यास तातडीने रेग्युलेटर बंद करणो.
4गॅसगळती झाल्यास कोणतेही विद्युत उपकरण बंद अथवा सुरू करू नये.
4तातडीने दारे-खिडक्या उघडून घराबाहेर पडावे. अग्निशमन दलाला, वितरकाला कळवावे.
4दर दोन वर्षानी शेगडी, गॅसपाईप व सिलिंडरची तपासणी करून घ्यावी.
4शेगडी सिलेंडरपासून उंचीवर असावी.
4गॅसपाईपची वेळोवेळी तपासणी करावी.