गॅस, केरोसिन महागणार
By admin | Published: June 26, 2014 12:42 AM2014-06-26T00:42:53+5:302014-06-26T00:42:53+5:30
दोन दिवस सातत्याने बैठका घेतल्यानंतर आता सरकारने एका दमात दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
Next
>नवी दिल्ली : गॅस आणि केरोसिनच्या अनुदानामुळे सरकारी तिजोरीवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी दोन दिवस सातत्याने बैठका घेतल्यानंतर आता सरकारने एका दमात दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, सरकारने या संदर्भात एक फॉम्यरुला निश्चित केला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत किमान 5 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे, तर केरोसिनची किंमत प्रतिमाह एक रुपया अशी वाढविण्यात येईल. सध्या हा फॉम्यरुला प्रस्तावाच्या पातळीवर असून, मंत्रीगटासमोर याची मांडणी होणार आहे. तिथे यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
केरोसिनच्या दरात प्रतिमाह 1 रुपया वाढ केल्यास केरोसिनपोटी देण्यात येणा:या अनुदानात किमान 85क् कोटी रुपयांची बचत होईल, तर गॅसमुळे किमान 12क्क् कोटी रुपयांची बचत होईल. डिङोलवरील अनुदानाच्या बोजामुळे डिङोलच्या किमतीत प्रतिमाह 5क् पैशांची दरवाढ करण्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या या फॉम्यरुल्याच्या धर्तीवर मोदी सरकारने हा फॉम्यरुला केल्याचे मानले जात आहे. रेल्वेदरवाढीमुळे आधीच सरकारवर टीकास्त्र सोडले जात असताना आणि गॅस व केरोसिनच्या दरात वाढ केल्यास महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने हा मध्यममार्गाचा विचार केल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4गॅस आणि केरोसिनचा फॉम्यरुला निश्चित झाला असला तरी, नैसर्गिक वायूच्या किमतीमधील दरवाढीसंदर्भात अद्याप कोणत्याही निर्णयार्पयत सरकार आलेले नाही. तेल व वायू उत्खननासाठी सध्या असलेल्या 4.2 दशलक्ष अमेरिकी डॉलर प्रति ब्रिटिश थर्मल युनिट दरामध्ये दुपटीने वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय सरकारकडे नसल्याने याची परिणती महागाई वाढण्यात होईल.
4असा निर्णय झाल्यास विजेच्या दरात प्रति युनिट 45 पैसे, खतांच्या किमतीत टनामागे 137क् रुपये, तर सीएनजी गॅसच्या दरात किलोमागे दोन रुपये 81 पैशांची वाढ होईल, तर याच तुलनेत पाईपगॅसच्या किमतीमध्येही वाढ अपेक्षित आहे. विशेषत: सीएनजी गॅसच्या दरात वाढ झाल्यास प्रवासखर्चातही वाढ अपरिहार्य मानली जात आहे.