मुंब्रा येथे अमोनिया टँकर उलटल्याने गॅस गळती
By admin | Published: May 24, 2015 12:05 PM2015-05-24T12:05:15+5:302015-05-24T16:22:46+5:30
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपासवर अमोनिया नेणारा गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती झाली असून या अपघातानंतर स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंब्रा (ठाणे), दि. २४ - ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपासवर अमोनिया नेणारा गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती झाली असून या अपघातानंतर स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु झाले आहे.
सुरतहून तळोजा येथे जाणारा गॅस टँकर मुंब्रा बायपासजवळ उलटला. या टँकरमध्ये सुमारे १४५० टन अमोनिया गॅस असून अपघातानंतर टँकरमधून गॅस गळतीला सुरुवात झाली. यानंतर स्थानिक रहिवाशांमधील काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. कौसा, सैनिकनगर या भागातील रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु आहे. अपघातामुळे बायपासवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.