खराबवाडीत गॅस पाईप फुटून गॅस गळती
By admin | Published: June 16, 2016 06:52 PM2016-06-16T18:52:06+5:302016-06-16T18:52:06+5:30
महाराष्ट्र नॅच्युरल ग्यास कंपनीच्या केबलची लाईन खोदकाम करताना जेसीबीने त्यांचीच ग्यास वाहून नेणारी पाईप लाईन फुटल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट झाली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 16 - चाकण खराबवाडी येथे रेकॉल्ड कंपनीजवळ महाराष्ट्र नॅच्युरल गॅस कंपनीच्या केबलची लाईन खोदकाम करताना जेसीबीने त्यांचीच गॅस वाहून नेणारी पाईपलाईन फुटल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष मनोज खराबी यांनी त्वरित कंपनीशी संपर्क साधला असता कंपनीचे इमर्जन्सी पथक गावात हजर झाले आणि गॅस गळती बंद केली.
गॅस गळती झालेल्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट होती. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गळती होऊन गॅसचा मोठ्या प्रमाणावर प्रेशरचा आवाज येत होता. इमर्जंसी पथकाचे अधिकारी येऊन ही गॅस गळती बंद केली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. पोलिसांना नागरिकांनी कळवूनही पोलीस या ठिकाणी फिरकलेही नाही.