चेंबूरमधील सीएनजीची गळती आटोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 01:12 PM2017-07-31T13:12:19+5:302017-07-31T13:30:44+5:30
चेंबूर नाक्याजवळ झालेली सीएनजीची गळती आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
मुंबई, दि. 31 - चेंबूर नाक्याजवळ झालेली सीएनजीची गळती आटोक्यात आणण्यात आली आहे. चेंबूर नाका परिसरातील भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपबाहेरच गॅस पाईपलाईन फुटली होती. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान,खबरदारी म्हणून सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
मोठ्या प्रमाणत गॅसची गळती होत असल्याने पोलिसांनी सायन- पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. यानंतर भारत पेट्रोलियमच्या कर्मचा-यांनी गॅस पाईपलाईन बंद केल्यानंतर 12.30 वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्वपदावर आली. या घटनेमुळे काही काळी वाहतुकीवर परिणाम झाला होता.