तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा -जयगडमध्ये एलएनजी टर्मिनलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:37 PM2018-05-02T20:37:58+5:302018-05-02T20:37:58+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये

Gas supply to household pipe in three years - inauguration of LNG terminal in Jijugad | तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा -जयगडमध्ये एलएनजी टर्मिनलचे उदघाटन

तीन वर्षात घरोघरी पाईपने गॅस पुरवठा -जयगडमध्ये एलएनजी टर्मिनलचे उदघाटन

Next
ठळक मुद्देदाभोळ प्रकल्पालाही गॅस पुरवठा होणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये हिरानंदानी गु्रपतर्फे फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये जिल्हयातील घराघरांमध्ये पाईपदवारे स्वयंपाक गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. देशातील केवळ महानगरांमध्येच उपलब्ध असलेली ही सुविधा येथे उपलब्ध झाल्यास रत्नागिरी हा अशी सुविधा मिळविणारा देशातील पहिला जिल्हा ठरू शकेल.

देशातील पहिल्या फ्लोटिंग स्टोरेज रिगॅसिफिकेशन युनिटवर आधारित एलएनजी टर्मिनलचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रकल्पादवारे थेट पाईप लाईनमधून दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टला गॅसचा पुरवठा ३६५ दिवस केला जाणार आहे. गॅसच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट वर्षातून केवळ ६ महिनेच कार्यरत आहे. एच एनर्जीच्या टर्मिनलमधून पाईपदवारे गॅसचा पुरवठा झाल्यानंतर दाभोळच्या रत्नागिरी पॉवर प्रोजेक्टमधून वर्षभर विजनिर्मिती शक्य होणार आहे.

टर्मिनल उदघाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जो प्रकल्प उभारण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो, असा हा प्रकल्प हिरानंदानी ग्रुपने केवळ १७ महिन्यात अत्यंत कल्पकतेने पूर्ण केला आहे. एलएनजी ही देशाची गरज आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराकडे देशाला नेण्याचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे. उद्योग, वाहतूक व घरगुती वापरासाठी जयगडचे हे टर्मिनल जिल्'ासाठी महत्वाचे ठरेल. पाईपलाईनमधून एलएनजी गॅस मिळणार असल्याने रत्नागिरीकर भाग्यवान असून महाराष्ट दिनी देशाला एक नवीन व्यवस्था मिळाली असल्याचे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी जयगड बंदर हे कोकण किनाºयाला लाभलेले वरदान असल्याचे सांगितले. कारखान्यांना गॅस इंधन मिळाले तर जयगड भागात व परिसरात कारखान्यांचा विकास वेगाने होईल. या पार्श्वभूमीवर पोर्टबेस इंडस्ट्री सिटी विकसित करायला हवी. कारखानदारीला आवश्यक वातावरण, सुविधा येथे आहेत, असे जेएसडब्ल्यूचे संचालक सज्जन जिंदाल यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती निरंजन हिरानंदानी, दर्शन हिरानंदानी, खासदार विनायक राऊत, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.


गॅस हे क्लीन फ्युएल
रत्नागिरी जिल्हयातील घरोघरी, वाहने व उद्योगांना इंधन म्हणून गॅस पुरवठा करण्यासाठी आवश्यक स्टोेरेज स्टेशन्स कंपनीतर्फे उभारली जाणार आहेत. घरांमध्ये दिला जाणारा हा गॅस एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळणार आहे. तसेच या गॅसच्या वापरामुळे स्वच्छ इंधन (क्लीन फ्युएल) उपलब्ध होणार असून अन्य इंधनाप्रमाणे प्रदुषणाचा धोका उरणार नाही.

 

 


 

 

Web Title: Gas supply to household pipe in three years - inauguration of LNG terminal in Jijugad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.