कसारा घाटात गॅस टँकर उलटला, मुंबई-नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत
By admin | Published: May 14, 2016 03:05 PM2016-05-14T15:05:24+5:302016-05-14T15:21:06+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा घाटात शनिवारी दुपारी गॅस वाहून नेणारा टँकर उलटला. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
कसारा, दि. १४ - मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील एका अवघड वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅसने भरलेला टँकर रस्त्यावरच उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटालगत लतीफवाडी ते चिंतामणवाडीनजिक मुंबईहून नाशिककडे येणा-या इंडेन कंपनीच्या गॅसने भरलेला कॅप्सुल टॅकर (जीजे - ०६- ६२१४ ) भरधाव वेगाने येत होता. महामार्गावरील अत्यंत धोकादायक वळणावर वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सूटल्याने गॅसचा टॅकर महामार्गावरच उलटला. यामुळे मुंबईहुन नाशिककडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प होती मात्र या अपघातात जिवीत हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी इगतपुरी- घोटी टॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी तत्काळ शहापूर टॅबचेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांना कळवले. तसेच याबाबत कर्मचारी घेऊन त्यांनी लतीफवाडीजवळ ठप्प झालेली मुबंईकडे व त्याचबरोबर नाशिककडील वाहतूक टप्याटप्याने वळवली. या गाडीचा चालक फरार झाला आहे.