हिरावाडीतून गौन खनिजाची वाहतूक
By admin | Published: May 6, 2014 02:08 PM2014-05-06T14:08:09+5:302014-05-06T15:23:18+5:30
नागरीक त्रस्त : कारवाईची मागणी
नागरीक त्रस्त : कारवाईची मागणी
पंचवटी : स्व. मीनाताई ठाकरे क्रिडा संकुल ते तारवालानगरला जोडल्या जाणार्या हिरावाडीतील मुख्य रस्त्यावरून सध्या गौन खनिजाने भरलेल्या चारचाकी अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. गौन खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांमुळे ध्वनीप्रदुषण मोठया प्रमाणात वाढले असुन अपघातात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले असुन अवजड वाहनांची वाहतूक करणार्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी हिरावाडीतील नागरीकांनी केली आहे.
महामार्ग ते दिंडोरीरोडला हिरावाडीचा रस्ता जोडला जातो त्यामुळे या रस्त्याने दिवसभर खडी, वाळू, विटा तसेच इंधनाने भरलेली वाहने जात असतात. दिवसभर या वाहनांची वर्दळ सुरू राहत असल्याने रस्त्याने येजा करणार्या महिलांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. गौन खनिजाने भरलेली वाहने तर रस्ता मोकळा दिसत असल्याने शंभराचा स्पीड ओलांडून वाहने नेतात त्यामुळे रस्त्यावरची धूळ तर उडतेच शिवाय ध्वनीप्रदुषण होत आहे परिणामी नागरीक चांगलेच त्रस्त झाले असुन या अवजड वाहतुकीला कोण आळा घालणार असा सवाल नागरीकांनी केला आहे. वाहतूक शाखेकडे अनेकदा तक्रार करूनही त्याचा उपयोग होत नसल्याने वाहतूक शाखेच्या कारभारावर नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
इन्फो बॉक्स
गौन खनिजाची चोरटी वाहतूक
स्व. मिनाताई ठाकरे क्रिडा संकुल ते तारवालानगर हा दिंडोरीरोडला जोडला जाणारा मुख्य मार्ग आहे. हिरावाडीतून गौन खनिजाने भरलेली वाहतूक दिवसभर सुरू असली तरी यातील अनेक वाहनात क्षमतेपेक्षा जास्त गौन खनिज भरलेले तर असतेच शिवाय काही वाहने मुख्य रस्त्याने न जाता नागरी वसाहतीतील छोटया रस्त्याने मार्ग काढत असल्याने गौन खनिजांची चोरटया पद्धतीने वाहतूक केली जात असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे.