महाराष्ट्रातील 28 शिक्षकांचा गौरव

By Admin | Published: September 6, 2014 02:40 AM2014-09-06T02:40:20+5:302014-09-06T02:40:20+5:30

आधुनिक काळात देश घडविताना शिक्षकांनी भारतीय मूल्यपरपंरा जोपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

Gaurav of 28 teachers in Maharashtra | महाराष्ट्रातील 28 शिक्षकांचा गौरव

महाराष्ट्रातील 28 शिक्षकांचा गौरव

googlenewsNext
नवी दिल्ली : शिक्षकांची भूमिका ही प्रकाशपुंजासारखी असते, जी विद्याथ्र्याना सदैव प्रकाशमय करण्याचे कार्य करते. आधुनिक काळात देश घडविताना शिक्षकांनी भारतीय मूल्यपरपंरा जोपासून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 
येथील विज्ञान भवनात एका शानदार सोहळ्यात देशातील 345 शिक्षकांना पुरस्कृत करण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील 28 शिक्षक आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी उपस्थित होत्या.राष्ट्रपती म्हणाले, की गतिमान, सुसंस्कृत, जबाबदार शिक्षित समाजाच्या निर्मिती प्रक्रियेत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांची भूमिका आधीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आह़े त्यामुळे शिक्षकांनी सदोदित नवीन संशोधन व अध्ययन करीत राहायला हवे, तरच तरुण पिढीला घडविताना सदैव नावीन्य टिकून राहील. राज्यातील 28 शिक्षकांना प्राथमिक शिक्षक गट, विशेष श्रेणी (प्राथमिक) गट, माध्यमिक विद्यालय शिक्षक गट व विशेष श्रेणी (माध्यमिक) अशा विभागांत पुरस्कृत करण्यात आले.केंद्रीय व नवोदय विद्यालयाच्या तीन शिक्षकानाही पुरस्काराने सन्मानित केले. प्रमाणपत्र, रजत पदक, 25,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (विशेष प्रतिनिधी) 
 
दिल्लीत सन्मानित करण्यात आलेले महाराष्ट्रातील शिक्षक
मंगल लक्ष्मण व्हटकर मुख्याध्यापक, (मोतीलालनगर म्युनिसिपल मराठी प्राथमिक शाळा, गोरेगाव प़, मुंबई), रवींद्र सुमतीलाल मावळे,( सहायक शिक्षिक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ता. खेड, जि. पुणो), आनंदराव अवधूतराव देशमुख (पदवीधर सहायक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), लक्ष्मण देवराव
साखरे (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक 
शाळा सावली, ता. मानवत, जि. परभणी), 
मंगला राजाराम रसाळ (मुख्याध्यापिका गुरुकुल विद्यालय, गोरेगाव पूर्व, मुंबई), मीरा राजाराम पाटील (सहायक शिक्षिका, विद्या मंदिर मोदाळ, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), हनमंत धोंडीराम गायकवाड (प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सान्वी केंद्र, ता. रैनापूर, जि. लातूर),  रमेश अण्णाप्पा पेठकर (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिसूर ता. मिरज, जि. सांगली), संगिता भिकनराव चव्हाण (सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बिसूर, मु. पो. बिसूर, ता. मिरज, जिल्हा प्रमुख प्राथमिक शाळा सिंदोन, तालुका केंद्र सातारा), चित्र सुभाषराव धोळे (सहायक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ता. हिवारी, जि. यवतमाळ), संभाजी महाजनराव आलेवाड (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद केंद्रीय, प्राथमिक शाळा ता. लोहा, जि. नांदेड), चंद्रकाल सोमाजी मेश्रम (सहायक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी विद्यालय, ता. परंदी, जि. अमरावती), प्रवीणकुमार मुत्ताण्णा पुल्लुवार (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, हरिनगर तालुका अहेरी, जि. गडचिरोली), यशश्री आऱ लोहकरे (सहायक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, करंजी (भोगे) जि. वर्धा), श्री घनश्याम विठ्ठलराव पाटील (मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा, राजगृहनगर, डिगढोह ता. हिंगणा, जि. नागपूर), 
श्री प्रकाश लक्ष्मण गरड (शिक्षक, एईएस बाई, इचरजबाई, फिरोदीया प्रशाला, नवी पेठ, जि. अहमदनगर), संजय भानुदास पाटील (सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), केकत निंभोरे (तालुका जामनेर जि. जळगाव), सुनील तुकाराम मोरे (सहायक शिक्षक, कै. द्वारकाबाई गणोश नाईक विद्यालय, दत्तवाडी, कुळगाव-बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणो), गोपाल पांडुबिसेन (सहायक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय, गौरटोला पोस्ट, मोहगाव, जि. गोंदिया), हरीशचंद्र यादवराव ढोबळे (कलाध्यापक, आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर), 
माध्यमिक विद्यालय शिक्षकाच्या श्रेणीतील पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील (सहायक शिक्षक बी. वाय़ हायस्कूल, पेठ वडगाव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), लीला अरु णकुमार झंवर (सहायक शिक्षिका, नारायणदास लड्डा हायस्कूल, बियाणी परिसर, दुर्गा विहार, जि. अमरावती), सुनील शंभूदयाल नायक (मुख्याध्यापक, ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय, नंदनवन, जि. नागपूर), आनंदा वसंत चरापले (सहायक शिक्षक, बाळासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर हायस्कूल, कौलव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), अनंत गजानन पाटील (मुख्याध्यापक, जमनाघर अग्रवाल माध्यमिक विद्यालय, जोगेश्वरी पूर्व, मुंबई), अश्फाक खान सईद खान पिंजारी (शिक्षक, अग्लो उर्दू हायस्कूल, शिवाजीनगर, दोंडाईचा, जि. धुळे),  संतोष कृष्णा पावडे (सहायक शिक्षक, सेवा विद्या मंदिर, आदिवासी हायस्कूल गगनगाव, पो. दापचारी, ता. डहाणू, जि. ठाणो), शोभा शिवाजी निकम (मुख्याध्यापिका, पीईएस मॉडर्न बालिका उच्च विद्यालय, शिवाजी नगर, जि. पुणो.)
 
शिक्षक म्हणून 38 वर्षे सेवा केली.झोपडपट्टीतील विद्याथ्र्याना दर्जेदार शिक्षण देऊन आमच्या शाळेने नेहमीच उत्तुंग कामगिरी बजावली आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवत शाळेने विद्याथ्र्यासह पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये येतात. पालक, संस्था आणि विद्याथ्र्यी या सर्वाना या पुरस्काराचे श्रेय आहे.
- मंगला रसाळ, मुख्याध्यापिका, गुरुकुल स्कूल, गोरेगाव 
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याने ज्ञानदानाची जबाबदारी वाढली आहे. 27 वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या कालावधीत विद्याथ्र्याकडून प्रोत्साहन मिळत गेले. त्यांच्या सहवासामुळे अधिक घडले. 
- मंगला व्हटकर, मुख्याध्यापिका, मोतीलाल नगर म्युन्सिपल मराठी प्राथमिक शाळा, गोरेगाव 

 

Web Title: Gaurav of 28 teachers in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.